ठाणे येथे सकल हिंदु समाजाचा मूक मोर्चा !

ठाणे – बांगलादेशातील हिंदु समाजावर होणारे अत्याचार थांबावेत आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता व्हावी, यासाठी येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने ८ डिसेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कचराळी तलाव ठाणे महापालिका मुख्यालयापासून मोर्चाला प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज मैदान, जांभळी नाका येथे मोर्चाचे विसर्जन होईल.