|
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2025/01/29225420/aurangazeb.jpg)
जळगाव – शहरातील तांबापुरा भागातून मुसलमान समुदायाची संदल (मिरवणूक) २४ जानेवारी या दिवशी काढण्यात आली. यात ‘डॉल्बी’चा वापर करण्यात आला होता. संदलमध्ये हिंदूंची कत्तल करणार्या आणि छत्रपती शंभूराजे यांची हत्या करणार्या औरंगजेबाचा फलक जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावण्याच्या हेतूने लावण्यात आला होता. शहरातील डी मार्ट चौकात चिथावणी देणारा एम्.आय.एम्.चे (‘ऑल इंडिया मजेलिस ए इत्तेहादुल मुसलीमीन’चे) अकबरुद्दीन ओवैसी यांचा ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा’, याविषयीचा संवाद ‘डॉल्बी’वरून जाणीवपूर्वक लावण्यात आला होता. (समाजविघातक कृत्य होऊनही पोलीस याविरोधात निष्क्रीय रहातात. यावरूनच त्यांची फूस कुणाला आहे, ते लक्षात येते. – संपादक) या प्रकरणी हिंदू संतप्त झाले. या घटनेला ५ दिवस होऊनही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. नेहमीप्रमाणे ‘प्रशासन तक्रारदाराच्या शोधात आहे कि काय ?’ असा प्रश्न येथील हिंदूंना पडलेला आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील वाघोदा, रावेर येथे काढलेल्या संदलमध्ये धर्मवीर संभाजीराजे यांची क्रूर हत्या करणार्या औरंगजेबाचे फलक हेतूपुरस्सर पकडण्यात आले होते, तसेच ओवैसी बंधूंचे ‘१५ मिनिटे’ असे लिहिलेले फलक धरण्यात आले होते. त्या वेळी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.
संपादकीय भूमिकाजळगावमध्ये आतापर्यंत संदलच्या संदर्भात घडलेल्या घटना पहाता यामागे प्रशासनाची कुचकामी भूमिका कारणीभूत आहे. संदल काढणार्यांना कायद्याचा कोणताच धाक उरलेला नाही, हे दिसून येते ! |