मालेगाव येथील राष्ट्रद्रोही घटना !
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2025/01/29230801/Disrespect-of-National-Flag_700.jpg)
मालेगाव – येथे २६ जानेवारी या दिवशी उभारलेल्या राष्ट्रध्वजाच्या शेजारीच गोमांसाची विक्री करून राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्या मोहसीन या तरुणाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी मनीष ढिलारे यांनी तक्रार प्रविष्ट केली. महापालिकेने २६ जानेवारी या दिवशी मांसविक्रीवर बंदी घालण्यासंबंधित नोटीस घोषित केली होती; मात्र आरोपी मोहसीनने नोटिसीचेही उल्लंघन केले. (कायद्याला न जुमानणारे धर्मांध ! – संपादक) त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकागोमांस तस्करीविषयी ठोस काहीही न करणार्या प्रशासनावर सरकार कारवाई करणार का ? राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्यांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा द्यायला हवी ! |