वाशी – बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणार्या अनन्वित अत्याचाराच्या विरोधात वाशी येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने ८ डिसेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. गावदेवी मरीआई माता मंदिर, जुहूगाव ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी पर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात विविध धार्मिक संस्था, संघटना, संत, कीर्तनकार आणि धर्माभिमानी हिंदू नागरिक सहभागी होणार आहेत.