कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने पाकिस्तानी सैन्याच्या बसमध्ये केलेल्या स्फोटात ६ जण ठार झाले, तर ३२ जण घायाळ झाले. घायाळांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. कराचीहून तुर्बत येथे जाणार्या या बसला न्यू बहमन येथे लक्ष्य करण्यात आले. हे सर्व सैनिक ‘फ्रंटियर कॉर्प्स’ या निमलष्करी दलाचे सदस्य होते. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या आक्रमणाच निषेध केला आणि मृत अन् घायाळ यांच्यासाठी प्रार्थना केली.
संपादकीय भूमिकापाकिस्तान भारतात जे घडवून आणतो, तेच त्याच्या देशातही घडत आहे ! दुसर्याचे वाईट करणार्याचे कधी चांगले होत नसते, हे पाकने लक्षात ठेवावे ! |