कोल्हापूर – ‘कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष प्रसाद निगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सचिव नीलेश कुलकर्णी यांनी इतिवृत्ताचे कथन केले, तर सचिव स्वप्नील मुळ्ये यांनी आर्थिक अहवाल सादर केला. संचालक ओंकार कारदगेकर यांनी ‘संघाच्या स्वतःच्या नूतनीकृत इमारतीत प्राचीन भारतीय विद्याशाखांचा अभ्यास समाजातील सर्व घटकांसाठी मोठ्या प्रमाणात करण्यात यावा’, हा ठराव मांडला.
‘कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघा’चे आणि सभेचे अध्यक्ष प्रसाद निगुडकर यांनी ‘देव, देश अन् धर्मासाठी, समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी, तसेच सभासदांच्या हितासाठी संघ तत्पर असेल’, असे प्रतिपादन केले. देशासाठी प्राणाची आहुती देणार्या वीरांना, देशातील थोर विभूतींना आणि सभासदांच्या कुटुंबियांना शांतीसूक्ताचे पठण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन निखिल शेंडुरकर यांनी केले. या वेळी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.