महाकुंभ २०२५
प्रयागराज – नागरिकांच्या सुरक्षेसाठी ६ रंगांच्या पासचे वितरण करण्यात आले आहे. यात अतीमहत्त्वाच्या लोकांसाठी पांढर्या रंगाचा, आखाड्यांसाठी केशरी रंगाचा, संस्थांसाठी पिवळ्या रंगाचा, प्रसारमाध्यमांना आकाशी, पोलिसांना निळा, तर आपत्कालीन सेवा देणार्यांना लाल रंगाचा पास देण्यात येणार आहे. पासच्या या प्रक्रियेसाठी सर्व विभागांत स्वतंत्र अधिकार्याची नेमणूक करण्यात आली आहे.
आवेदन (अर्ज) करण्याची प्रकिया !
पास हवा असणार्या संबंधितांनी आवेदनाससमवेत स्वतःचे आधारकार्ड, पॅनकार्ड, छायाचित्र, वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र आणि वाहन परवाना यांच्या छायांकित प्रती द्याव्या लागतील. त्यानंतर अस्थायी मेळा कार्यालयात असलेल्या पोलीस कक्षात पासचे वितरण केले जाईल.