महिलेला अटक
मुंबई – घरात पाळलेली मांजर लपवली म्हणून निशाद शेख (वय ३८ वर्षे) हिने एका ५ वर्षांच्या मुलीला पुष्कळ मारहाण करून लोखंडी रॉडने चटके दिले. गोवंडी येथील शिवाजीनगर भागात रहाणार्या या महिलेला अटक करण्यात आली आहे.
पाळलेली मांजर सापडत नसल्याने निशाद शेख अस्वस्थ झाली होती; पण तिच्या शेजारी रहाणार्या ५ वर्षांच्या मुलीनेही याविषयी सांगण्यास नकार दिला. यानंतर निशादने तिच्या उजव्या पायाला चटका दिला. या घटनेनंतर मुलीला रुग्णालयात भरती करण्यात आले. आता मुलीची प्रकृती ठीक असून तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
संपादकीय भूमिकाधर्मांधांच्या क्रौर्याची परिसीमा ! |