फलंदाजावर ५०० रुपयांच्‍या नोटा उधळल्‍या !

भारतीय चलनाचा अपमान झाल्‍याची टीका व्‍यक्‍त

प्रतिकात्मक चित्र

कोनगाव (भिवंडी) – येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित केलेल्‍या क्रिकेट स्‍पर्धेत पवन या फलंदाजाने वारंवार चौकार आणि षटकार लगावत ३५ धावा केल्‍या. हे पाहून प्रेक्षक विकास भोईर यांनी मैदानात येऊन पवनच्‍या अंगावर ५०० रुपयांच्‍या काही नोटा उधळल्‍या. त्‍या सर्व नोटा गोळा करून पवनला देण्‍यात आल्‍या. भारतीय चलनाचा भर मैदानात अपमान झाल्‍याची टीका काहींनी केली आहे.

संपादकीय भूमिका :

जनतेला आजपर्यंत सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांनी धर्मशिक्षण न दिल्‍यामुळे पैशांचा वापर कसा करायचा ? हे न कळणेे दुर्दैवी !