पुणे येथे सैन्य अधिकार्‍याची ३७ लाख रुपयांची फसवणूक !

दुसरे सैन्य अधिकारी डी.एस्. पाटील यांच्यावर गुन्हा नोंद

प्रतिकात्मक चित्र

पुणे – कोकणामध्ये भूमी खरेदीचे आमीष दाखवून लेफ्टनंट कर्नल प्रताप सिंह यांची ३७ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल डी.एस्. पाटील यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (फसवण्याची आणि भ्रष्टाचाराची कीड सैन्यातील अधिकार्‍याला लागणे अपेक्षित नाही ! – संपादक)

सिंह हे खडकीतील ‘बॉम्बे सॅपर्स’मध्ये नियुक्तीस होते. तेव्हा लेफ्टनंट कर्नल पाटील यांनी कोकणामध्ये भूमी खरेदी करून देतो, असे आमीष दाखवून ३७ लाख रुपये घेतले होते. भूमी खरेदी केली नाही आणि पैसेही परत केले नाहीत, असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.