आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेल्‍या रोहिंग्‍यांना बाहेर कोण काढणार ? – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि

आळंदी (पुणे) येथील संत संवाद कार्यक्रम !

प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि

आळंदी (जिल्‍हा पुणे) – आजचा तरुण अमली पदार्थांच्‍या अधीन होत आहे. त्‍याचे प्रमाण पंजाबमध्‍ये अधिक आहे, पंजाब पोखरला आहे. हे अमली पदार्थांचे लोण महाराष्‍ट्रात येऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत. आळंदी परिसरामध्‍ये मोठ्या प्रमाणावर रोहिंग्‍यांचे प्रमाण दिसून येते, हे रोहिंगे आले कोठून ? त्‍यांना बाहेर कोण काढणार ? त्‍यावरही नियंत्रण आणण्‍याची आवश्‍यकता आहे, तसेच मराठ्यांचा इतिहास, शिवरायांचा खरा इतिहास तरुणांपुढे आणण्‍याची आवश्‍यकता आहे. महाराष्‍ट्र जागवण्‍याचे आणि महाराष्‍ट्राला दिशा देण्‍याचे काम व्‍हावे, असे उद़्‍गार प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि यांनी आळंदी येथे काढले. आळंदी-मोशी रस्‍त्‍यावरील वेदश्री तपोवन येथे आयोजित केलेल्‍या संत संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्‍यासपिठावर मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस; शांतिब्रह्म, वारकरी भूषण ह.भ.प. मारुति महाराज कुर्‍हेकर; ह.भ.प. भास्‍करगिरी महाराज, मंत्री राम शिंदे आदी उपस्‍थित होते.

प्रतिकात्मक छायाचित्र

या वेळी प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या जिरेटोपाची प्रतिकृती मुख्‍यमंत्र्यांना देऊन त्‍यांचा सत्‍कार केला; मात्र मुख्‍यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांचा जिरेटोप न घालता सन्‍मानपूर्वक नमन करून तो स्‍वीकारला.

संपादकीय भूमिका

असे संतांना सांगावे लागणे दुर्दैवी ! प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कृती करणे आवश्‍यक !