पोरबंदर (गुजरात) – येथे तटरक्षक दलाच्या विमानतळावर हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू झाला. या अपघाताविषयी तटरक्षक दलाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. हे हेलिकॉप्टर विमानतळावर उतरत असतांना हा अपघात झाला. तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याचे एका अधिकार्याने सांगितले. हेलिकॉप्टरमध्ये ३ जण होते. हेलिकॉप्टर कोसळत असतांना जीव वाचवण्यासाठी एकाने उडी घेतली; मात्र तो वाचू शकला नाही.