मुंबई – मुंबई शहर आणि उपनगरांतील ‘मेट्रो’ प्रकल्पांचा आणि मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या माध्यमातून चालू असणार्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. या वेळी त्यांनी ‘मेट्रो’ची कामे पूर्ण करण्यासाठी सुधारित वेळापत्रक करण्याचे निर्देश दिले. ४ जानेवारी या दिवशी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली.
या वेळी ते म्हणाले, ‘‘सर्व ‘मेट्रों’ची कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने सिद्ध करा. कामांमध्ये विलंब चालणार नाही. अनेक ठिकाणी कारशेडविना ‘मेट्रो’ चालू होत आहेत. त्यामुळे ‘मेट्रो’ चालू करण्यासाठी त्यासाठी थांबू नका. जगात असे प्रयोग होत आहेत, त्याचा अभ्यास करा. भविष्यातील सर्व संभाव्य ‘मेट्रो’ प्रकल्पांचा आढावा घेत, त्याच्या कारशेडसाठी जागा आतापासूनच आरक्षित करा. यंदाच्या वर्षात २२ कि.मी. ‘मेट्रो’ चालू करण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी दिले.