मुख्‍यमंत्र्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे त्‍यागपत्र घ्‍यावे ! – सुरेश धस, भाजप, आमदार

सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस

पुणे – वाल्‍मिक कराडसारख्‍यांनी बीडची इतकी वाईट अवस्‍था केली आहे की, बीडचा बिहार नाही, तर तालिबान, काबूल आणि हमास झाला आहे. वाल्‍मिक कराड आणि त्‍याचे साथीदार १७ भ्रमणभाष वापरत असत. याची सर्व सूची मी राज्‍य गुन्‍हा अन्‍वेषण शाखेला दिली आहे. त्‍याचे अन्‍वेषण केल्‍यास कुणाकडे किती खंडणी मागितली, हे सगळे समोर येईल. आवादा आस्‍थापनेच्‍या संदर्भात मी जे आरोप केले आहेत, त्‍याचा मुख्‍यमंत्र्यांनी छडा लावावा. जोपर्यंत या गुन्‍ह्याचे पूर्ण अन्‍वेषण होत नाही, तोपर्यंत मुख्‍यमंत्र्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे त्‍यागपत्र घ्‍यावे, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली. ते संतोष देशमुख हत्‍या प्रकरणात पुणे येथे झालेल्‍या सर्वपक्षीय मोर्चात बोलत होते.