शिरूर (पुणे) येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने पुकारलेला बंद यशस्वी !

राममंदिराच्या आवारात चिकन-मटण मेजवानी केल्याचा निषेध

प्रतिकात्मक चित्र

शिरूर (जिल्हा पुणे) – शहरातील सर्वांत जुन्या असलेल्या राममंदिराच्या आवारात अज्ञात व्यक्तींनी चिकन आणि मटण मेजवानी केल्याचे आढळले होते. त्यामुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ ३ डिसेंबर या दिवशी शिरूर शहर बंद ठेवण्याचे आवाहन हिंदु संघटनांनी केले होते. (संबंधित दोषींना अटक होऊन शिक्षा होईपर्यंत हिंदूंनी पाठपुरावा करणे आवश्यक ! – संपादक) त्यास शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

शहरातील सर्वच व्यापार्‍यांनी या संघटनांना सकारात्मक प्रतिसाद देऊन स्वत:चे व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. दुपारनंतर आमदार ज्ञानेश्वर कटके आणि माजी आमदार अशोक पवार, तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने मंदिर ‘ट्रस्टी’ आणि सकल हिंदु समाजाच्या नागरिकांच्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

शिरूर शहरात अनेक वर्षे जुन्या राममंदिरातील बांधकामही अनेक दिवसांपासून रखडले. हे बांधकाम व्हावे, अशी मागणी या वेळी बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, लहुजी शक्ती सेना आणि हिंदूंनी केली.

संपादकीय भूमिका :

राममंदिराच्या आवारात चिकन-मटण मेजवानी होत असतांना एकाही हिंदूच्या ते लक्षात कसे आले नाही ?