हिंदु जनजागृती समितीची जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी !
सांगली, ४ डिसेंबर (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांसाठी आवाज उठवणारे इस्कॉनचे चिन्मय कृष्णदास प्रभु यांना अनुचितरित्या देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अन्याय्य अटकेच्या विरोधात आणि तेथे होणार्या हिंदु अल्पसंख्यांकांवरील अत्याचार अन् मानवी हक्कांच्याविषयी भारताने त्वरित हस्तक्षेप करून सक्षम कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन ४ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. या वेळी जिल्हाधिकार्यांच्या वतीने तहसीलदार (महसूल) श्री. अमोल कुंभार यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अभिजित कोडग, गणेश सगरे, विशाल ओलेकर, अमित कवठेकर, मंगेश चव्हाण, शुभम होसमठ, अमित सूर्यवंशी, गणेश कोळेकर, नितीन राक्षे, गणेश कोळेकर, नितीन राक्षे, संतोष देसाई उपस्थित होते.