कोल्हापूर, ५ जानेवारी (वार्ता.) – बेळगाव-निपाणीसह कोल्हापूर शहरपंचक्रोशीतून आलेल्या १ सहस्र १०० महिलांच्या उपस्थितीत पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर सामुदायिक श्री महालक्ष्मी स्तोत्र पठण, तसेच कुंकूमार्चन करण्यात आले. विश्व हिंदु परिषद, दास साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी महिलांनी पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान करून श्री महालक्ष्मीदेवी मंदिर ते पद्याराजे गर्ल्स हायस्कूल अशी शोभायात्रा काढली. या सोहळ्यास विश्व हिंदु परिषदेचे बेळगाव विभाग सत्संग प्रमुख डॉ. विजयेंद्राचार्य जोशी, श्री. अशोक रामचंदानी, श्री. अजित ठाणेकर, निपाणी येथील भाजपचे आमदार सौ. शशिकला जोल्ले, श्रीदेवी कुलकर्णी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.