तुर्भे (नवी मुंबई) येथे कचराकुंड्यांनी अडवले रस्ते !
तुर्भे विभाग कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या तुर्भे गाव आणि तुर्भे कॉलनी परिसरात स्वच्छता विभागाच्या भोंगळ कारभारामुळे कचराकुंड्या रस्त्यावर ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे कचराकुंड्या भरून वाहू लागल्या की, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.