‘अमृतवृक्ष’ संकल्पना घरोघरी पोचवा ! – सुधीर मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ (एक वृक्ष आईच्या नावावर) या संकल्पनेच्या धर्तीवर राज्यात ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ या संकल्पनेवर राज्य सरकारच्या वनविभागाद्वारे काम चालू झाले आहे.

सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यशासन ‘संविधान मंदिरे’ उभारणार !

महाराष्ट्रातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १६३ शासकीय तांत्रिक विद्यालये यांमध्ये राज्यशासन संविधान मंदिरे उभारणार आहे.

सरकारने तात्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा !

उरण येथील कु. यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करणार्‍या नराधमाला भरचौकात फाशी द्यावी आणि सरकारने तात्काळ  ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा, अशी मागणी करणारे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना देण्यात आले.

‘कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित संस्थे’च्या संस्कार शिबिराची आज सांगता !

‘कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित संस्था’ ही गेली १० वर्षे धार्मिक, सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी संस्कार शिबिराचे आयोजन केले जाते. यात अथर्वशीर्ष, रुद्र, उदकशांती, सूक्तपाठ, शिवमहिम्न स्तोत्र अशा स्तोत्रांचे पठण केले जाते.

पिंपरी (पुणे) येथील अनधिकृत विज्ञापन फलकधारकांसाठी अनुमती घेण्याविषयी सूचना !

अनधिकृत फलकांना रितसर अनुमतीसाठी प्राधिकरणामध्ये ८८० प्रस्ताव प्राप्त आले आहेत; परंतु निम्म्याहून अधिक प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत. परिणामी त्याविषयी पुन्हा कार्यवाही करण्याची पत्रे पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती प्राधिकरणाने दिली आहे.

PFI : पी.एफ्.आय.शी संबंधित मौलवीने हिंदु मुलीचे केले धर्मांतर !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने आणि पालकही मुलांना धर्मशिक्षण देत नसल्याने आणि हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्याने धर्मांध मुसलमान अशांचा बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर करत असल्यास आश्‍चर्य ते काय ?

पूरग्रस्त भागात कर्तव्य बजावलेले पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्यासाठी आरोग्य शिबिर !

जिल्ह्यात नुकत्याच उद्भवलेल्या पूरस्थितीत कर्तव्य बजावलेले प्रसार माध्यमांतील पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्या आरोग्य पडताळणीसाठी ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन’च्या विशेष सहकार्याने ‘कोल्हापूर प्रेस क्लब’ येथे आरोग्य शिबिर पार पडले.

अवैध आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी दौंड येथील स्टेट बँकेतील खाती गोठवली !

ऑनलाईन खेळ आणि जुगारासाठी दौंड येथील स्टेट बँक शाखेत चालू खाते उघडून खात्यातील रकमेतून अवैध आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी बँकेतील ८४ खाती गोठवली आहेत.

Administration’s failure in Wayanad :वायनाड (केरळ) येथील भूस्खलनातील साहाय्यकार्यात अपयशी ठरल्याची प्रशासनाची स्वीकृती !

वायनाड येथील भूस्खलनाच्या पाचव्या दिवशी प्रशासनाने साहाय्यकार्यात ठोस पावले उचलण्यात अपयशी ठरल्याचे मान्य केले.

सांगली येथे पुन्हा पुराची शक्यता !

कोयना परिसरात पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पावसाची चेतावणी आणि वाढीव विसर्ग यांमुळे सांगली येथे पुन्हा पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.