‘एस्.टी.’ची कोल्‍हापूर-मुंबई आणि कोल्‍हापूर-शिर्डी शयनयान बससेवा चालू !

‘एस्.टी.’च्‍या कोल्‍हापूर विभागासाठी ६ नवीन शयनयान (स्‍लीपर) गाड्या प्राप्‍त झाल्‍या आहेत. त्‍यांपैकी प्रतिदिन कोल्‍हापूर-बोरीवली (रात्री ८.३० वाजता), कोल्‍हापूर-मुंबई (रात्री ९.३० वाजता), तसेच कोल्‍हापूर-शिर्डी (रात्री ८ वाजता) या गाड्या चालू करण्‍यात आल्‍या आहेत.

दुसर्‍याशी प्रेमसंबंध असल्‍याच्‍या संशयातून प्रेयसीला दुसर्‍या मजल्‍यावरून ढकलल्‍याने तरुणीचा जागीच मृत्‍यू !

संयमाचा अभाव असणार्‍या तरुण पिढीला सक्षम करण्‍यासाठी त्‍यांना धर्मशिक्षण देणे आवश्‍यक आहे !

‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्‍यायालयात चालवावेत ! – पुणे पोलीस आयुक्‍तांची मागणी

कल्‍याणीनगर येथील ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्‍यायालयात चालवण्‍यात यावेत, अशी मागणी करणार असल्‍याची माहिती पुण्‍याचे पोलीस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी दिली.

शिरोळ तालुक्यात (कोल्हापूर) पुराच्या पाण्यातून जाणारा ट्रॅक्टर उलटला !

बस्तवाड-आकीवाट मार्गावर ट्रॅक्टरमधून ७ जण नदीच्या पुलावर आलेअसता पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ट्रॅक्टर वाहून जाऊ लागला. ट्रॅक्टरचालकाचा ताबा सुटल्याने तो नदीपात्रात उलटला.

हिंजवडीत (पुणे) पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी !

हिंजवडीमध्ये २ ऑगस्टला भर दिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सला लुटण्यात आले आहे. हिंजवडीमधील लक्ष्मी चौक या ठिकाणी असलेल्या ‘शिवमुद्रा ज्वेलर्स’ नावाच्या दुकानात ३ चोर शिरले…

सरकारने देवस्‍थानच्‍या वर्ग २ च्‍या इनामी भूमींच्‍या संदर्भात घेतलेल्‍या निर्णयाला मंदिर महासंघाचा तीव्र विरोध ! – सुनील घनवट, राज्‍य समन्‍वयक, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ

सरकारचा प्रस्‍तावित निर्णय मंदिरांना कायमस्‍वरूपी आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल करणारा असल्‍याने ‘महाराष्‍ट्र मंदिर महासंघा’चा या निर्णयाला तीव्र विरोध आहे.

जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे ! – ‘पतित पावन संघटने’ची मागणी

लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या ताईला न्याय मिळेल का ?’, ‘जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे !’, अशा घोषणा देत राज्यासह संपूर्ण भारतात जिहाद्यांकडून निष्पाप लोकांवर होत …

Mumbai High court to Khaled Hussain : पाकिस्तानात किंवा आखाती देशात जा !

हुसेन याची येथे रहाण्याची मुदत संपल्याने पुणे पोलीस प्रशासनाने त्याला देश सोडून जाण्याची नोटीस बजावली; मात्र त्या विरोधात हुसेन याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.

Indira Gandhi Jayanti : राजस्‍थानात शाळांमध्‍ये इंदिरा गांधी जयंती साजरी करण्‍यावर बंदी !

राजस्‍थानच्‍या शिक्षण विभागाने राज्‍यातील शाळांमध्‍ये इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्‍यावर बंदी घातली आहे. यासह सरकारने शाळेच्‍या ‘कॅलेंडर’मधून इंदिरा गांधी जयंतीची नोंद हटवण्‍यात आली आहे.

 मुसलमान आणि ख्रिस्ती समाजाच्या आरक्षित जागेप्रकरणी १६ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा डाव ! – नितीन शिंदे, माजी आमदार

शामरावनगर येथील मुसलमान आणि ख्रिस्ती समाजासाठी आरक्षित असलेल्या जागेप्रकरणी १६ कोटी रुपये घोटाळा करण्याचा डाव रचलेला आहे.