|
ठाणे, १५ ऑगस्ट (वार्ता.) – मुंब्रा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ने तिरंगा मिरवणूक काढली होती. यात धर्मांधांनी टिपू सुलतानचे छायाचित्र असलेले फलक हाती धरले होते. काही लोकांनी ‘टिपू सुलतान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. तणाव निर्माण होऊ नये; म्हणून पोलिसांनी मिरवणूक रोखली. त्यामुळे धर्मांधांनी याचा निषेध केला.
‘टिपू सुलतान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याने हिंदूंनी संताप व्यक्त केला. स्थानिक पोलिसांनी टिपू सुलतानचे छायाचित्र असलेले फलक हटवण्याचा आदेश दिल्यावर स्थानिक मुसलमान नेते आणि कार्यकर्ते यांनी पोलिसांशी वाद घातला. (अशांवर पोलीस कारवाई करणार कि त्यांच्यासमोर नेहमीप्रमाणे नांगी टाकणार ? – संपादक)
Posters of Tipu Sultan during the ‘Social Democratic Party of India’ (SDPI ) I-Day Tiranga rally !
📍Mumbra, Maharashtra
Police stopped the rally
Chants of ‘Tipu Sultan Zindabad’ : Hindus outraged
In Maharashtra, putting up Afzal Khan slaying posters is banned as it hurts the… pic.twitter.com/vEXngg8EGm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 15, 2024
टिपूचे उदात्तीकरण करणार्यांना योग्य वेळी ठेचू ! – आमदार नितेश राणे, भाजप
टिपू सुलतानचे फलक लावणार्यांना योग्य वेळी ठेचण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे. टिपू सुलतानच्या समोरच्या बाजूला त्या लोकांना लवकरच झोपवण्यात येईल.
संपादकीय भूमिका
|