कर्नाटकातील चामराजनगर येथे भारतीय वायुदलाचे विमान कोसळले : दोन्ही वैमानिक सुरक्षित

वायुदलाने या घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे.

गेल्या आठवडाभरात गुंड आणि तस्कर यांनी ५० सहस्र कोटी रुपयांच्या २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेतल्या !

२ सहस रुपयांच्या नोटांच्या संदर्भातील देहली उच्च न्यायालयाच्या निकालावर देण्यात आलेल्या आव्हान याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

मणीपूर राज्यातील हिंसाचाराची सीबीआय आणि न्यायालयीन चौकशी होणार ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

ते मणीपूरच्या ४ दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील स्थितीची माहिती घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत वरील घोषणा केली.

हिंदूंच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नसते ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अस्वच्छ ठिकाणी माणसालाही चांगले वाटत नाही, तेथे देवाला चांगले वाटेल का ? जेथे स्वच्छता असते, तेथे देवाचे वास्तव्य असते, हे लक्षात घेऊन हिंदूंनी मंदिरांमध्ये स्वच्छता राखणे आवश्यक ! यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे !

दमोह (मध्यप्रदेश) येथील खासगी शाळेत हिंदु मुलींनी परिधान केला हिजाबसारखा गणवेश !

सरकारकडून चौकशीचा आदेश !

२ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेण्यासाठी नक्षलवाद्यांची खटपट !

बस्तर विभागातील विजापूर, सुकमा, दंतेवाडा, नारायणपूर यांसह इतर नक्षलग्रस्त भागांत नक्षलवाद्यांकडे मोठ्या संख्येने २ सहस्र रुपयांच्या नोटा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

#Exclusive : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच दिव्यांग आणि वृद्ध यांना घरबसल्या मतदान करता येणार !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अशा प्रकारे प्रथमच प्रयोग केला जात आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली.

गोवा : मुसलमानांनी गोव्यातून पळवून नेलेल्या २ अल्पवयीन मुलींची हुब्बळ्ळी येथून सुटका

तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर ४८ घंट्यांत गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. या दोन्ही मुली हिंदु धर्मीय होत्या का ? याची माहिती मिळू शकलेली नाही.

गोवा : शासनाकडून पणजी परिसर, तसेच पणजी ते बाणस्तारी आणि पणजी ते झुआरी पूल या मार्गांवर वाहनांसाठी वेगमर्यादा अधिसूचित

उत्तर गोवाचे जिल्हा दंडाधिकारी यांनी वाहनांसाठी वेगमर्यादा त्वरित प्रभावाने अधिसूचित केली आहे. ती देत आहोत.