पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट !
नवी देहली – नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड हे भारताच्या दौर्यावर आले असून त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार आहे. यात दोन्ही देशांतील सीमावादावरही चर्चा होऊ शकते. पंतप्रधान प्रचंड यांच्या सन्मानार्थ हैदराबाद हाऊसमध्ये विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारत के चार दिवसीय दौरे पर आए नेपाली पीएम पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ गुरुवार को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मिलेंगे. इस दौरान दोनों देशों के बीच ऊर्जा, संपर्क और व्यापार के क्षेत्रों में बढ़ावा देने पर चर्चा होगी.#pushpakamaldahal https://t.co/qZG39h8MVg
— AajTak (@aajtak) June 1, 2023
पंतप्रधान प्रचंड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान प्रचंड नवी देहलीतील ‘नेपाळ-भारत बिझनेस समिट’ला संबोधित करतील. ते भारतात उपस्थित असलेल्या नेपाळी समुदायाच्या लोकांनाही भेटणार आहेत. पंतप्रधान प्रचंड हे चीनच्या जवळचे मानले जातात. त्यांनी अनेक वेळा भारतविरोधी वक्तव्ये केली आहेत.