मणीपूर राज्यातील हिंसाचाराची सीबीआय आणि न्यायालयीन चौकशी होणार ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

इंफाळ (मणीपूर) – मणीपूर राज्यातील हिंसाचाराची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांच्या नेतृत्वातील आयोग करेल. यासह हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांची चौकटी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआयकडून) केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केली.

ते मणीपूरच्या ४ दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील स्थितीची माहिती घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत वरील घोषणा केली. या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मणीपूर सरकार आणि केंद्रशासन प्रत्येकी ५ लाख रुपयांचे साहाय्य, तसेच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देेईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.