अधिवक्ता श्री. अश्विनीकुमार उपाध्याय यांचा दावा !
नवी देहली – २ सहस रुपयांच्या नोटांच्या संदर्भातील देहली उच्च न्यायालयाच्या निकालावर देण्यात आलेल्या आव्हान याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेतांना ओळखपत्र तपासण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. ती उच्च न्यायालयाने फेटाळली होती. भाजपचे नेते आणि अधिवक्ता श्री. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी ही याचिका प्रविष्ट केली होती.
#SupremeCourt refuses to entertain urgent plea against ₹2,000 note withdrawalhttps://t.co/lQdAwDwxEB pic.twitter.com/cNdR2bzsQh
— Business Insider India🇮🇳 (@BiIndia) June 1, 2023
अधिवक्ता उपाध्याय यांनी दावा केला की, गुंड आणि तस्कर यांनी गेल्या आठवडाभरात ५० सहस्र कोटी रुपयांच्या नोटा पालटून घेतल्या आहेत. अशा प्रकारे सर्व काळा पैसा पांढरा केला जात आहे.
|