पोवई नाका (सातारा) येथील शिवस्‍मारकाचे नाव पालटण्‍याचा प्रयत्न कुणी करू नये ! – रंजना रावत, माजी नगराध्‍यक्षा

पोवई नाका येथील शिवस्‍मारक सर्व शिवभक्‍तांचे प्रेरणास्‍थान आहे. हे प्रेरणास्‍थान कायमस्‍वरूपी ‘शिवस्‍मारक’ म्‍हणून रहाणे आवश्‍यक आहे. शिवप्रभूंहून दिगंत कीर्तीचे कुणी होईल किंवा कुणी असेल, असे वाटत नाही. याठिकाणी अन्‍य कुणाच्‍या नावाने काही करण्‍याचे धाडस कुणी करू नये.

औरंगजेबाच्‍या मजारच्‍या संरक्षित स्‍मारकाचा दर्जा काढण्‍याचे धैर्य दाखवा ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

औरंगजेबाच्‍या विषयावरून राजकारण करण्‍यापेक्षा औरंगजेबाच्‍या ज्‍या चुकीच्‍या गोष्‍टी आहेत, त्‍या समाजातून हटवल्‍या पाहिजेत. 

(म्‍हणे) ‘औरंगजेबाचा ‘राज्‍याभिषेक सोहळा’ साजरा करा !’

औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्‍याविषयी सातत्‍याने पोस्‍ट टाकून महाराष्‍ट्रात दंगली पेटवण्‍याचे मोठे षड्‌यंत्र चालू नाही ना, याची पोलीस आणि प्रशासन यांनी चौकशी करावी. संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्‍यक !

छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्‍त्‍याच्‍या कामात गडबड करणार्‍या कंत्राटदाराला रगडून टाकीन ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्‍त्‍याच्‍या कामावर पत्रकारांनी लक्ष ठेवावे. काहीही गडबड झाल्‍यास मला कळवावे. संबंधित कंत्राटदारावर आमच्‍याकडून कडक कारवाई करण्‍यात येईल. त्‍याला रगडून टाकायचे काम मी करीन, असे प्रतिपादन केंद्रीय रस्‍ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत केले.

समान नागरी कायदा दृष्टीक्षेपात : विधी आयोगाने जनतेकडून मते मागवली !

देशात समान नागरी कायदा लागू करण्याची हिंदूंची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी दृष्टीक्षेपात ! मान्यताप्राप्त धार्मिक संघटनांना ३० दिवसांत मते पाठवण्याचे आवाहन !!!

खेड तालुक्यातील १३ जणांची लाखो रुपयांची फसवणूक

विदेशात नोकरी लावून देतो, असे सांगत १३ जणांची १४ लाख ३५ सहस्र रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार मोहम्मद सलीम अब्दल्ला सैन यांनी खेड पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली आहे.

रत्नागिरी नगर परिषदेचा पहिला क्रमांक  : १ कोटी ५० लाख रुपयांचे मिळाले पारितोषिक !

शासनाकडून गेल्या वर्षी माझी वसुंधरा अभियान ३.० राबवण्यात आले. या अभियानामध्ये पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वअंतर्गत केलेल्या कामाचे मूल्यांकन करण्यात आले.

लालमहालात (पुणे) सलग १२ घंटे वारकर्‍यांनी लुटला कीर्तनाचा भक्तीमय आनंद !

पंढरपूरचा पांडुरंग आणि वारकरी यांचे अतूट नाते आहे. वारकरी हे पांडुरंगाच्या दर्शनाला न जाता पांडुरंगाला भेटायला जातात. पंढरीचा पांडुरंग हा दर्शनाचा नाही, तर भेटायचा देव आहे.

‘द कश्मीर फाइल्स’प्रमाणे ‘गोवा फाइल्स’ संदर्भात चर्चा होणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

१६ जूनपासून गोव्यात ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !

(म्हणे) उत्तराखंड कुणाच्या बापाचे नाही ! – समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्र रहमान बर्क

लव्ह जिहादच्या घटनेनंतर उत्तरकाशीमध्ये मुसलमानांना दुकाने रिकामी करावी लागल्याने समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्र रहमान बर्क यांचा जळफळाट !