लव्ह जिहादच्या घटनेनंतर उत्तरकाशीमध्ये मुसलमानांना दुकाने रिकामी करावी लागल्याने समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्र रहमान बर्क यांचा जळफळाट !
डेहराडून (उत्तराखंड) – देवभूमी उत्तरखंडमधील उत्तरकाशीमध्ये ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी मुसलमानांना दुकाने रिकामी करण्यास भाग पाडल्याने उत्तरप्रदेशच्या संभल जिल्ह्यातील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी पुष्कर सिंह धामी सरकारविषयी संताप व्यक्त केला आहे. ‘उत्तराखंड कुणाच्या बापाचे नाही’, अस वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. मुसलमान समाजाच्या लोकांनी ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण घडल्यानंतर पुरोलातील भाड्याची दुकाने रिकामी केली होती. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
उत्तराखंड किसी के बाप का नहीं है… मुस्लिमों के पलायन पर भड़के सपा सांसद ने दी चेतावनी#Uttarakhand #Lovejihad
More Updates : https://t.co/pIT1flEMGx
Must Read : 👇👇https://t.co/WoUngW1jDm
— Zee Uttar Pradesh Uttarakhand (@ZEEUPUK) June 13, 2023
बर्क पुढे म्हणाले, ‘आम्ही मुसलमानांना उत्तराखंडमधून कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित होऊ देणार नाही.’ २०२४च्या लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप सरकार हिंदु आणि मुसलमान यांच्यामध्ये द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दुसरीकडे जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद असद मदनी यांनी उत्तरकाशीमध्ये मुसलमानांना दुकाने रिकामी करण्यास भाग पाडल्याने चिंता व्यक्त केली आहे. मदनी यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पत्र लिहून भारतातील नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. (मुसलमानांवर संकट ओढवले की, त्यांच्या जीविताची आणि मालमत्तेची काळजी वाटणार्या मौलाना मदनी यांनी जम्मू-काश्मीरमधील हिंदूंवर ओढवलेल्या अशाच संकटाच्या वेळी असे आवाहन केल्याचे ऐकिवात नाही ! – संपादक) मौलाना मदनी यांनी या पत्रात १५ जून २०२३ या दिवशी उत्तरकाशी येथे होणारी महापंचायत थांबवण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाप्रत्येक विषयावरून राजकारण करणारे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवून त्यांच्या जीवनाची राखरांगोळी करणार्या त्यांच्या धर्मबांधवांना खडे बोल सुनावले असते, तर ते योग्य ठरले असते ! |