संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा बाजीराव विहीर येथे रिंगण सोहळा !

बाजीराव विहीर येथे पार पडलेल्या या रिंगण सोहळ्यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अश्वाने २ फेर्‍या मारल्यानंतर माऊलींच्या अश्वाच्या खुराने उधळलेली माती स्वत:च्या कपाळी लावण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.

‘माऊली’च्या जयघोषात चांदोबाचा लिंब येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा!

माऊलींच्या रथाजवळ अश्व आल्यावर सोहळाप्रमुखांनी अश्वास पुष्पहार घालून खारीक-खोबर्‍याचा नेवैद्य दाखवला. यानंतर अश्वाने दौड घेतली. पुढे माऊलींचा अश्व आणि मागे स्वारींचा अश्व अशी दौड पूर्ण झाली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे लोणंद येथे आज नीरा नदीत स्नान होणार !

वारीच्या मार्गांमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना ३ वेळा स्नान घालण्यात येते. प्रथम आळंदीतून प्रस्थान होण्याआधी इंद्रायणी नदीमध्ये, दुसरे निरा नदीमध्ये, तर तिसरे स्नान पंढरपूरला पोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये घातले जाते.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या स्वागतासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘‘पालखी मार्गावर शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी स्थानिक मंगल कार्यालये, उपाहारगृहे यांचे साहाय्य घेतले जाणार आहे. तात्पुरत्या शौचालयांचीही उभारणी करण्यात आली आहे.”

हिरवळीने सजलेला दिवे घाट ओलांडून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवड मुक्कामी !

पालखी तळ नगरपालिकेकडून स्वच्छ करण्यात आला असून सासवड शहरही स्वच्छ केले आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूस कापडाच्या झालरी लावून विद्युत् रोेषणाई केली आहे. माऊलींच्या पालखीचा जेथे विसावा असेल, त्या परिसरामध्येही विद्युत् रोषणाई केली आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पुणे येथे उत्साहाने स्वागत !

स्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या लाखो भाविकांनी पालखी सोहळ्यांवर पुष्पवृष्टी करत, टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. २ जुलै या दिवशी पालखी पुणे येथून प्रस्थान करेल.  

संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांची तीर्थयात्रा

संत नामदेव म्हणू लागले, ‘‘मला माझा विठ्ठल डोळ्यांना दाखवा. इतरांशी मला काय करणे आहे ? तो पहावा, तो भेटावा, एवढीच माझी आस आहे.’’

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे २९ जूनला प्रस्थान

६ जुलैला माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान होईल. १४ जुलैला चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण, तर १२ जुलैला पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होणार आहे.

माऊलींचे मानाचे अश्व आळंदीकडे मार्गस्थ !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासमवेत आषाढी वारीला जाण्यासाठी मानकरी शितोळे सरकार यांचे मानाचे अश्व शितोळे अंकली (कर्नाटक) येथून आळंदीकडे मार्गस्थ झाले आहेत.