सातारा, १४ जून (वार्ता.) – पोवई नाका येथील शिवस्मारक सर्व शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहे. हे प्रेरणास्थान कायमस्वरूपी ‘शिवस्मारक’ म्हणून रहाणे आवश्यक आहे. शिवप्रभूंहून दिगंत कीर्तीचे कुणी होईल किंवा कुणी असेल, असे वाटत नाही. याठिकाणी अन्य कुणाच्या नावाने काही करण्याचे धाडस कुणी करू नये. याठिकाणी अधिकार गाजवून जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रकार कुणी करत असेल, तर तो जनतेच्या माध्यमातून हाणून पाडण्यात येईल, अशी चेतावणी सातारा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ. रंजना रावत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पोवई नाका परिसरात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीचे स्मारक आहे. समस्त शिवभक्तांच्या सहकार्याने, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने, सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून या स्मारकाचे सुशोभिकरण चालू आहे. येथे अन्य महापुरुषांचे स्मारक किंवा आयलँड करण्याचा घाट घालू नये.
राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांची शिवस्मारकास भेटया पार्श्वभूमीवर राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी शिवस्मारकास भेट देत पहाणी केली. याठिकाणी अन्य काही नको, अशी भूमिका राजमाता यांनी मांडली. |