पाकमध्ये धर्मांधांच्या आक्रमणात घायाळ झालेल्या हिंदूचा मृत्यू

इस्लामी देश पाकिस्तानमध्ये असुरक्षित हिंदू !

‘पठाण’ चित्रपटातील १० दृश्यांमध्ये पालट करण्याचा सेन्सॉर बोर्डाचा आदेश

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) ‘पठाण’ चित्रपटातील १० दृश्ये पालटण्यास सांगितले आहे. तसेच काही संवादही पालटण्यास सांगितले आहे.

आदिवासी समाजाने धर्मांतराच्या विरोधात ७ जिल्ह्यांमध्ये पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्तीसगडमध्ये ख्रिस्तीधार्जिणे काँग्रेसचे सरकार सत्तेत असल्यामुळे तेथे धर्मांतर करणार्‍यांवर कारवाई होईल, अशी अपेक्षाच नको. तेथे परिणामकारक संघटनाद्वारेच धर्मांतराचे प्रकार रोखले जाऊ शकतात !

 काश्मीरमधील एजाज अहमद अहंगर याला भारत सरकारने घोषित केले आतंकवादी !

केंद्रीय गृह मंत्रालयाने मूळचा काश्मीरमधील असलेला एजाज अहमद अहंगर उपाख्य अबू उस्मान अल-काश्मिरी याला आतंकवादी घोषित केले आहे. काश्मिरी याचे अल् कायदाशी संबंध आहेत. तो भारतात इस्लामिक स्टेटला पुन्हा चालना देण्याच्या प्रयत्नात आहे.

चित्रपट, मालिका आदींद्वारे होणारा धर्माचा अवमान रोखण्यासाठी ‘धर्म सेन्सॉर बोर्ड’ची स्थापना

द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली स्थापना ! नवी देहली – चित्रपट, सामाजिक माध्यमे आणि दूरचित्रवाणी यांद्वारे होणारा हिंदूंच्या देवतांचा, धर्माचा अवमान रोखण्यासाठी आता ‘धर्म सेन्सॉर बोर्ड’ची स्थापना करण्यात आली आहे. द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी याची स्थापना केली आहे. हे बोर्ड चित्रपटांतील धार्मिक गोष्टींवर … Read more

कर्णावती येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘पठाण’ चित्रपटाची भित्तीपत्रके फाडली !

बजरंग दलाचे अध्यक्ष ज्वलित मेहता यांनी म्हटले की, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी परिधान केलेल्या कपड्यांना आमचा विरोध आहे. ‘पठाण’ चित्रपट ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देतो. त्यामुळे आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही.

बांदा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदूंच्या संघटनासाठी प्रेरणादायी ठरेल ! – हेमंत मणेरीकर, हिंदु जनजागृती समिती

असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

बायणा येथील मंदिराच्या पुजार्‍याला मारहाण करणार्‍यांवर कारवाई करा, अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा आणू !

या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या तक्रारदारांना संबंधित पोलिसांनी संतापजनक वागणूक  दिली. या वेळी पोलीस आसंदीवर पाय ठेवून तक्रारदारांशी बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून नागेशी (गोवा) येथे अखिल भारतीय स्तरावरची ‘समन्वय बैठक’

नागेशी, फोंडा येथे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची संघाचे काही प्रमुख अखिल भारतीय पदाधिकारी आणि निवडक संघ प्रेरित विविध संघटनांचे पदाधिकारी यांची अखिल भारतीय स्तरावरची ‘समन्वय बैठक’ होणार आहे.

मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाला कंटाळून पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांचा दुकान विकण्याचा निर्णय !

राणे यांच्यावर आलेली ही वेळ हिंदूंना विचार करायला लावणारी आणि वस्तूस्थितीची जाणीव करून देणारी आहे ! निवेदनांकडे दुर्लक्ष करण्याच्या पोलिसांच्या वृत्तीमुळे नागरिकांनी कायदा हातात घेतला, तर आश्चर्य वाटू नये !