सातारा येथे माजी आमदाराच्या बंद निवासाच्या परिसरात आढळला अर्धवट पुरलेला मृतदेह !

भाजपच्या माजी आमदार कांताताई नलवडे यांच्या बंद असलेल्या निवासस्थानाच्या परिसरात मातीत अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आला आहे. तालुका पोलिसांचे रात्री उशिरापर्यंत मृतदेहाविषयी माहिती घेण्याचे काम चालू होते.

खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचार्‍यांचा ७२ घंटे संप !

वीज मंडळाच्या खासगीकरणाच्या विरोधात ४ जानेवारीपासून ७२ घंट्यांचा संप वीज कामगार करणार आहेत, अशी माहिती ‘एम्.एस्.ई.बी. वर्कर्स फेडरेशन’चे विलास कोले यांनी २ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा भाजप महिला मोर्चाच्या वतीने निषेध !

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’ नव्हते, असे म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ सांगली भाजप महिला मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर २ जानेवारीला निषेध आंदोलन करण्यात आले.

संभाजीनगर येथे भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सभेचे फलक फाडले !

२ जानेवारी या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी भाजपकडून शहरातील चौकाचौकांत फलक लावण्यात आले होते. तथापि उच्च न्यायालयासमोरील चौकात भाजपच्या कार्यकत्र्यांनी लावलेले फलक बंजारा ब्रिगेडकडून फाडण्यात आले.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू !

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाची व्दिवार्षिक निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानुसार कोकण विभागामध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.

तीव्र विरोधामुळे ‘सोनी लिव’ दूरचित्रवाणीच्या संकेतस्थळावरून मालिकेतील वादग्रस्त  भाग हटवला !

हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधाचा परिणाम ! यापुढे अशी हिंदुद्वेषी मालिका पहायच्या का ?, याचा हिंदूंनी विचार करावा !

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये फेरी !

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा, या मागणीसाठी येथे ‘हिंदु धर्म जागरण समिती’ने १ जानेवारी या दिवशी फेरी काढली. त्यात अनेक धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

६३३ भारतीय बंदीवानांना मुक्त करा !

भारताने पाकिस्तानला त्याच्या कारागृहातील शिक्षा पूर्ण झालेले भारतीय आणि ज्यांचे नागरिकत्व भारतीय असल्याची निश्‍चिती झाली आहे, अशांची मुक्तता करण्याचे आवाहन केले आहे.

(म्हणे) ‘आदि शंकराचार्य यांच्यामुळे जातीव्यवस्था अस्तित्वात आली !’ – साम्यवादी नेत्याचा फुकाचा आरोप

हिंदु धर्मात जाती व्यवस्था नाही, हेही ठाऊक नसलेले साम्यवादी. हिंदु धर्माचा काडीचाही अभ्यास न करता अशी वक्तव्ये करून हिंदूंना भ्रमित करणार्‍यांना हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करावा !

अमेरिकेवरील आक्रमणापूर्वीच ब्रिटन लादेन याला करणार होता ठार !

‘ब्रिटनच्या पूर्वी आम्ही लादेन याला ठार करणार’, या अमेरिकेच्या हव्यासामुळे लादेन बचावला. अमेरिकेच्या या कारवाईमुळे ब्रिटनला त्याची योजना पूर्ण करता आली नाही, असे आता समोर आले आहे.