आज विटा (जिल्‍हा सांगली) येथे भव्‍य ‘हिंदु गर्जना मोर्चा’ !

खानापूर तालुक्‍यातील सकल हिंदु समाजाच्‍या वतीने २४ जानेवारीला सकाळी १० वाजता भव्‍य ‘हिंदु गर्जना मोर्चा’चे आयोजन करण्‍यात आले आहे. ‘लव्‍ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्‍या यांच्‍या विरोधात कठोर कायदे व्‍हावेत, मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवावेत, या प्रमुख मागण्‍यांसाठी हा मोर्चा काढण्‍यात येणार आहे.

अनिल देशमुख यांच्‍या जामिनाच्‍या स्‍थगितीची याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळली !

महाराष्‍ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍या जामिनाला स्‍थगिती द्यावी, यासाठी केंद्रीय अन्‍वेषण यंत्रणेने केलेली याचिका २३ जानेवारी या दिवशी सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळून लावली. देशमुख यांना मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या जामिनाला स्‍थगिती मिळावी, यासाठी केंद्रीय अन्‍वेषण यंत्रणेने सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका केली होती.

हिंदु संस्‍कृतीच्‍या रक्षणासाठी देवस्‍थानाचा विकास आवश्‍यक ! – सुरेश चव्‍हाणके, ‘सुदर्शन न्‍यूज’ वृत्तवाहिनी

प्रत्‍येक देवस्‍थान हे हिंदु संस्‍कृतीचे प्रेरणास्‍थान असल्‍यामुळे त्‍यांचा विकास झाला पाहिजे. हिंदु संस्‍कृतीच्‍या रक्षणासाठी त्‍याची आवश्‍यकता आहे. देवस्‍थानांच्‍या माध्‍यमातून धार्मिकता वाढीस साहाय्‍य होते. नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाच्‍या दर्शनाने समाधान लाभले.

अयोध्‍या येथील श्रीराम मंदिराचा गाभारा ७०० कोटींचा !

संपूर्ण देशाचे लक्ष असलेले अयोध्‍या येथील श्रीराम मंदिर जानेवारी २०२४ च्‍या शेवटच्‍या आठवड्यात भाविकांसाठी खुले होणार आहे. आतापर्यंत मंदिराच्‍या गर्भगृह निर्मितीवर ७०० कोटी रुपयांहून अधिक व्‍यय झाला आहे; पण गर्भगृह आणि सुरक्षा भिंत या पहिल्‍या टप्‍प्‍यावर १ सहस्र ५०० कोटी रुपयांपर्यंत व्‍यय येणार आहे…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपत्तीचे जी.आय.एस्. सर्वेक्षण करून महसूल गळती रोखणार ! – मुख्यमंत्री

गोवा शासनाने अशा सविस्तर सर्वेक्षणास प्रारंभ केला आहे. या सर्वेक्षणामुळे कर व्यवस्थितपणे गोळा करता येणार आहे, तसेच अवैध बांधकामे शोधून काढता येणार आहेत.

सर्वेक्षणातील चुकीमुळे धनगरवाडी, आरोस येथील ५ कुटुंबे पाण्यापासून वंचित रहाण्याची शक्यता

धनगरवाडी अतीदुर्गम भागात आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. नळपाणीपुरवठा योजनेसाठी सर्वेक्षण करतांना येथील २५ पैकी ५ कुटुंबांना वगळण्यात आले आहे.

परीक्षा हा सण असावा ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसतांना काळजी करू नये, तर तो एक सण म्हणून साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे केले.

लातूर येथील बालगृहातील अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार !

येथील महिला आणि बालविकास विभागाच्‍या बालगृहातील अल्‍पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्‍यावर बलात्‍कार करण्‍यात आला. या घटनेनंतर लातूर एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्‍यात मुलीच्‍या मैत्रिणीसह ५ जणांविरुद्ध भारतीय दंड विधान आणि पॉक्‍सो कायद्यानुसार गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

हिलटॉप बार अँड रेस्टॉरंटमध्ये झालेला स्फोट गॅस गळतीमुळे ! – उपअधीक्षक जीवबा दळवी

‘ही एक गंभीर घटना आहे आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अशा घटना हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहे.’’ स्फोटाविषयी संशयास्पद काही नाही ! – जसपाल सिंह, पोलीस महासंचालक

ऑस्ट्रेलियात खलिस्तानवाद्यांकडून तिसर्‍या हिंदु मंदिराची तोडफोड !

कॅनडाप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही खलिस्तानी चळवळ चालू झाली असून त्याला ऑस्ट्रेलियात कोण खतपाणी घालत आहे ?, याचा  भारताने ऑस्ट्रेलिया सरकारला शोध घ्यायला भाग पाडले पाहिजे.