शिकाऊ आधुनिक वैद्यांकडून कामबंद आंदोलनास प्रारंभ !

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्‍हा आधुनिक वैद्यांवर आक्रमणे होऊ लागल्‍याने सर्व शिकाऊ आधुनिक वैद्यांनी काम बंद आंदोलन आरंभले आहे. मागील वर्षभरात झालेल्‍या आक्रमणात एका आधुनिक वैद्याचा मृत्‍यूही झाला होता.

लाखो भाविकांच्‍या उपस्‍थितीत श्रीक्षेत्र पाल (जिल्‍हा सातारा) येथे श्री खंडेराया आणि श्री म्‍हाळसादेवी यांचा विवाह सोहळा पार पडला !

लाखो भाविकांच्‍या उपस्‍थितीत श्री खंडेराया आणि श्री म्‍हाळसादेवी यांचा विवाह सोहळा ‘येळकोट येळकोट जय मल्‍हार’, ‘सदानंदाचा येळकोट’, ‘खंडोबाच्‍या नावानं चांगभलं’, या जयघोषांमध्‍ये पार पडला.

वणी (यवतमाळ) येथील भंगारचोरांचे सुरक्षारक्षकावर लोखंडी सळईने आक्रमण !

येथील परिसरातील बंद असलेल्‍या पिंपळगाव कोळसा खाणीतील भंगार चोरतांना सुरक्षारक्षकांनी आडकाठी आणल्‍याने चोरट्यांनी लोखंडी सळईने सुरक्षारक्षक विशाल खंडारे यांच्‍यावर आक्रमण केले.

सातारा येथील श्री नटराज मंदिरात वार्षिक रथोत्‍सव उत्‍साहात संपन्‍न !

जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी, सातारा विभागाचे साहाय्‍यक धर्मादाय आयुक्‍त सौ. ढबाले आणि इतर मान्‍यवर यांच्‍या हस्‍ते रथपूजन झाले. वेदमूर्ती दत्तात्रय शास्‍त्री जोशी आणि वेदमूर्ती जगदीश भट यांच्‍या मार्गदर्शनाखाली रथपूजन झाल्‍यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला.

कराड येथील श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे ज्‍येष्‍ठ धारकरी रवींद्र केशव डोंबे यांचे निधन !

चौंडेश्‍वरीनगरमधील श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे ज्‍येष्‍ठ धारकरी रवींद्र केशव डोंबे (वय ५१ वर्षे) यांचे बुधवार, ४ जानेवारी या रात्री हृदयविकाराच्‍या तीव्र झटक्‍यामुळे निधन झाले. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील ३ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायत यांना जलप्रदूषणाविषयी राष्‍ट्रीय हरित प्राधिकरणाची नोटीस

जिल्‍ह्यातील मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत यांच्‍याकडून कोणतीही प्रक्रिया न करता प्रतिदिन लाखो लिटर प्रदूषित सांडपाणी समुद्र आणि नद्या यांमध्‍ये सोडले जात आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात कन्‍नड भाषेतील साधना शिबिराला आरंभ

सनातन संस्‍थेच्‍या वतीने येथील सनातनच्‍या आश्रमात ६ जानेवारी २०२३ या दिवशी कन्‍नड भाषेतील साधना शिबिराला चैतन्‍यमय वातावरणात आरंभ झाला. शिबिराच्‍या प्रारंभी शंखनाद करण्‍यात आला.

भाजप शासित ५ राज्यांतील धर्मांतरविरोधी कायद्याला ‘जमात उलेमा-ए-हिंद’कडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान

‘लव्ह जिहाद’द्वारे होणार्‍या धर्मांतराला कुणाचे समर्थन आहे, हे आता याद्वारे समोर येत आहे, हे लक्षात घ्या !

लघुशंका करण्याचे प्रकार विमानात घडत असतील, तर हे एअर इंडियाचे अपयश आहे !

विमानातून विदेशात प्रवास करणार्‍यांमध्ये नैतिकता, सुसंस्कृतपणा किती आहे, हेच या घटना दाखवून देतात ! अशांवर संस्कार करण्यास शिक्षणपद्धत अपयशी ठरली, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

इराकमध्ये दुचाकी शर्यत पहाण्यासाठी आलेल्या १७ वर्षांच्या मुलीवर मुसलमान पुरुषांकडून आक्रमण !

एल्. तारानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या १७ वर्षीय मुलीवर पुरुषांच्या मोठ्या गटाने ‘अभद्र’ पोशाख परिधान केल्याचा आरोप करत आक्रमण केले.