‘पठाण’ चित्रपटातील १० दृश्यांमध्ये पालट करण्याचा सेन्सॉर बोर्डाचा आदेश

हिंदूंच्या विरोधाला यश !

नवी देहली – केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) ‘पठाण’ चित्रपटातील १० दृश्ये पालटण्यास सांगितले आहे. तसेच काही संवादही पालटण्यास सांगितले आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातून भगव्या रंगाचा अवमान करण्यासह अश्लीलता पसरवण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर बोर्डाकडून त्याची नोंद घेत वरील पालट करण्यास सांगितले आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.