पाकमध्ये धर्मांधांच्या आक्रमणात घायाळ झालेल्या हिंदूचा मृत्यू

इस्लामी देश पाकिस्तानमध्ये असुरक्षित हिंदू !

दिगरी मीरपूरखास (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील देह-१५० या गावातील नाथू भिल याच्यावर धर्मांधांकडून काही दिवसांपूर्वी आक्रमण करण्यात आले होते. उपचारांच्या वेळी नाथू याचा मृत्यू झाला आहे.

त्याच्या नातेवाइकांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी अब्दुल जाट, अब्दुल रौफ जाट, अल्ताफ जाट आणि इतर यांनी नाथू यांच्यावर आक्रमण केले होते. ‘आम्हाला न्याय हवा आहे’, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.