आष्टा (जिल्हा सांगली) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यास अनुमती !

अनुमती न घेता अवैधरित्या पुतळा बसवल्याचे कारण पुढे करत पोलीस प्रशासनाने ३ जानेवारीला सायंकाळी मंडप हटवला होता, तसेच मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही हटवला होता. याच्या निषेधार्थ शिवप्रेमींनी ४ जानेवारीला आष्टा-वाळवा बंदची हाक दिली होती.

जालना येथे साडेचार मासांत २ वेळा राष्ट्रध्वज पालटावा लागला !

येथील रेल्वेस्थानकाच्या समोर १०० फूट उंचीवर डौलाने फडकत असलेला राष्ट्रध्वज फाटलेल्या अवस्थेत दिसत असल्यामुळे राष्ट्रभक्त संतप्त झाले आहेत. १६ ऑगस्ट २०२२ या दिवशी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या ध्वजाचे अनावरण झाले होते.

श्रीरामप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पनवेल ते कल्याण मशाल यात्रेचे आयोजन !

पनवेल येथील कलावंती दुर्ग ते कल्याण येथील दुर्गाडी गड असे ५९ कि.मी. अंतर मशाल यात्रेत सहभागी झालेल्यांनी पार केले. यात्रा दुर्गाडीदेवीच्या मंदिरात पोचल्यावर ‘हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी शक्ती दे’, असा आशीर्वाद मागून सर्वांनी महाआरती केली.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जी भाषा सर्वांना जोडते, सर्वांना सामावून घेते आणि जात, धर्म, पंथ पलीकडची माणुसकी शिकवते तीच खर्‍या अर्थाने विश्वाची भाषा होते. हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी ठासून भरले आहेत.

लाच मागितल्याच्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील मलंग तांबोळी याला अटक !

दारूबंदी कायद्यानुसार नोंद असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळावा, यासाठी सहकार्य करण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील जवान मलंग तांबोळी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

भाजपचे नेते माधव भंडारी यांच्या पत्नी सुमित्रा भंडारी यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन

भाजपचे नेते माधव भंडारी यांच्या पत्नी सुमित्रा भंडारी यांचे ३ जानेवारी या दिवशी वयाच्या ६० व्या वर्षी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. सुमित्रा भंडारी या परभणी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नानासाहेब वेलणकर यांच्या कन्या होत्या.

प्रदूषणाच्या नावाखाली केवळ हिंदूंवर होणारी एकमार्गी कारवाई थांबवावी !

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केवळ हिंदूंच्या गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी सणांच्या वेळी एकमार्गी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. लोकशाहीमध्ये भारतीय राज्यघटनेनुसार कारभार करतांना सर्व धर्मांना समान वागणून मिळणे अपेक्षित असतांना प्रदूषण मंडळाकडून होत असलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

‘सैनिक सुरक्षा’ कायदा करा ! – निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत

माजी सैनिकांना संरक्षण मिळण्यासाठी कायदा करण्याची मागणी करावी लागणे, हे दुर्दैवी आहे. समाजाची सात्त्विकता वाढल्यासच गुंडप्रवृत्ती अल्प होणार आहे. त्यासाठी धर्मशिक्षणाला पर्याय नाही !

आजपासून सांगलीत श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन महोत्सव !

५ जानेवारीपासून प्रतिदिन दुपारी २.३० ते सायंकाळी ६ पर्यंत ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या सुश्राव्य आवाजात श्रीराम कथा होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य आयोजक श्री. मनोहर सारडा यांनी केले आहे.

वीज कामगार संघटना आणि सरकार यांच्यातील सकारात्मक चर्चेनंतर वीज कर्मचार्‍यांचा संप मागे !

पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार संघटना यांच्यात ४ जानेवारी या दिवशी झालेल्या बैठकीत वीज कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांविषयी सकारात्मक तोडगा काढण्यात आला. त्यानंतर ४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून वीज कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे.