‘श्रीरामचरितमानस’चा अवमान करणारे बिहारचे मंत्री चंद्रशेखर आणि उत्तरप्रदेशचे समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांना तात्काळ अटक करा !

दोन्ही नेत्यांवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तात्काळ गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त करण्यात आली.

नियम धाब्यावर बसवणार्‍या मद्यालयांवर कारवाई करा ! – बीड जिल्हाधिकारी

मद्यविक्री करणार्‍या दुकानदारांकडून नियम धाब्यावर बसवले जात आहेत, हे जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लक्षात का आले नाही ?

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पुरेसा निधी देऊ ! – उपमुख्यमंत्री

वर्ष २०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. महानगरपालिकेने त्याचा आराखडा सादर करण्याची सूचना त्यांनी केली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘शैक्षणिक शिष्यवृत्ती योजने’ला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ !

नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने विविध घटकातील विद्यार्थ्यांसाठी ‘शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना’ घोषित करण्यात आली आहे.

सातारा येथे समर्थ रामदासस्वामी पादुका पूजन सोहळा !

शहरातील रामाचा गोट येथील भटजी महाराज मठाजवळील दक्षिणमुखी राघव मारुति मंदिरात राष्ट्रसंत समर्थ रामदासस्वामी यांच्या पादुकांचा पूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

संस्कृतला देशाची अधिकृत भाषा बनवा ! – माजी सरन्यायाधीश शरद बोबडे

देशाच्या एका माजी सरन्यायाधिशांनी अशा प्रकारचे विधान करणे, ही मोठी गोष्ट आहे. केंद्र सरकारने याविषयी गांभीर्याने विचार करावा, असे धर्माभिमानी हिंदूंना वाटते !

संमेलनाच्या निधीची वाढीव २ कोटी रुपयांची रक्कम मिळाली नाही !

संमेलन अगदी समीप आलेले असतांना सरकारने ही रक्कम लवकरात लवकर द्यावी, ही मराठीप्रेमींची अपेक्षा !

भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वांत महान मुत्सद्दी ! – एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वांत महान मुत्सद्दी आहेत. धोरणात्मक संयमाचे मोठे उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण ! श्री हनुमान तर मुत्सद्देगिरीच्याही पलीकडे गेले होते. ते लंकेला गेले, तिथे त्यांनी सीतेशी संपर्क साधला, लंकेला आगही लावली, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी व्यक्त केले.