महाजनांमधील वादामुळे मंदिरांचे उत्सव बंद होऊ नयेत, यासाठी कायद्यात पालट करू ! – महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात

कायद्यात पालट करून प्रशासकाला ‘कोणत्याही परिस्थितीत उत्सव बंद होणार नाही’, असा अधिकार दिला पाहिजे. महाजन त्यांचा वाद न्यायालयात जाऊन सोडवू शकतात; मात्र उत्सव साजरीकरणावर त्याचा परिणाम होऊ नये, याची सरकारने काळजी घ्यावी.

महिलेची छेड काढणारे संभाजीनगरचे साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त निलंबित !

येथील शहर पोलीस दलात साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त असलेले विशाल ढुमे यांच्‍यावर एका महिलेचा विनयभंग केल्‍याप्रकरणी गुन्‍हा नोंद करण्‍यात आला होता. त्‍यानंतर नागरिकांकडून यावरून मोठ्या प्रमाणावर संताप व्‍यक्‍त केला जात होता.

कुणीही ‘नायलॉन मांजा’ (दोरा) विक्रीसाठी ठेवल्‍यास कायदेशीर कारवाई ! – पोलीस निरीक्षक, स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण, कोल्‍हापूर

पतंग उडवतांना नायलॉन मांजाचा वापर केल्‍याने ‘सामान्‍य नागरिकांच्‍या जीवितास धोका उत्‍पन्‍न होतो, तसेच पशू-पक्षी घायाळ होतात. पतंगासाठी नायलॉज मांजाची विक्री न करण्‍याविषयी उच्‍च न्‍यायालय आणि शासन यांनी निर्देश दिले आहेत.

युक्रेनमधील हेलिकॉप्‍टरच्‍या अपघातात एका मंत्र्यासह १६ जण ठार !

डेनिस मोनास्‍टिसस्‍की असे मृत्‍यू झालेल्‍या मंत्र्याचे नाव आहे. ‘हेलिकॉप्‍टरचा अपघात नेमका कसा झाला ?’, ‘ते इमारतीला कस धडकले ?’, हे अद्याप समजू शकलेले नाही.

छोटा शकीलने मुंबईतील खंडणी पाकिस्‍तानात पाठवली ! – राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणा

गुन्‍हेगारी जगताचा कुख्‍यात गुंड दाऊद इब्राहिम याचा उजवा हात असणार्‍या छोटा शकीलने मुंबईतील व्‍यापार्‍यांकडून वसूल केलेली खंडणी पाकिस्‍तानात पाठवली आहे, अशी माहिती टेरर फंडिंग प्रकरणी राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने केलेल्‍या अन्‍वेषणातून समोर आली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्‍या उमेदवारांनी निवडणूक व्‍यय तपशील १९ जानेवारीपर्यंत सादर करण्‍याचे निर्देश ! 

ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्‍या उमेदवारांनी निवडणूक व्‍यय तपशील १९ जानेवारीपर्यंत सादर करावा. तपशील सादर न केल्‍यास संबंधित उमेदवारांना अपात्र ठरवून पुढील ५ वर्षे निवडणूक लढवण्‍यास प्रतिबंध केला जाईल

कल्‍याण येथे आगीत आजी आणि नात यांचा होरपळून मृत्‍यू !

कल्‍याण येथील एका इमारतीमधील सदनिकेला १७ जानेवारीला पहाटे भीषण आग लागली. त्‍यात खातीजा आजी हसम माईमकर (वय ७० वर्षे) आणि तिची नात इब्रा रौफ शेख (वय २२ वर्षे) यांचा होरपळून मृत्‍यू झाला आहे.

सनातन धर्म हा ‘हिंदु राष्‍ट्रा’चा प्राण ! – बबिता गांगुली, हिंदु जनजागृती समिती

आराबाग (बंगाल) येथे ‘महाभारत संघा’च्‍या वार्षिक समारंभामध्‍ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

त्रिपुरात १६ फेब्रुवारी, तर मेघालय आणि नागालँड येथे २७ फेब्रुवारीला मतदान !

केंद्रीय निवडणूक आयोगाने त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे दिनांक घोषित केले. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी, तर मेघालय आणि नागालँड या राज्यांमध्ये २७ फेब्रुवारी या दिवशी मतदान होणार आहे. सर्व राज्यांचे निकाल २ मार्च या दिवशी घोषित होतील.

चॅट जीपीटी’ तंत्रज्ञान प्रणालीकडून होत आहे हिंदूंच्या देवता आणि धर्मग्रंथ यांचा अवमान

ही प्रणाली तिच्या कोडींगप्रमाणे उत्तर देत असते. त्यामुळे तिचे कोडींग करतांना हिंदु धर्माविषयीच्या प्रश्‍नावर आक्षेपार्ह उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.