छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ न म्‍हणणे, हा त्‍यांच्‍या विचारांशी द्रोहच ! – उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्‍वराज्‍यरक्षक’ म्‍हणायला कुणाचीच ना नाही, ते ‘स्‍वराज्‍यरक्षक’ आहेतच; पण ते ‘धर्मवीर’ नाहीत, असे म्‍हणणे, हा एक प्रकारे त्‍यांच्‍या विचारांशी द्रोह आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांवर अन्‍यायच आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्‍या भावासह १०० जणांवर मिरज शहर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद !

जागा मालकीच्‍या प्रकरणावरून हा प्रकार घडला असून या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्‍यासह १०० जणांवर मिरज शहर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

वाई (सातारा) येथे लग्‍नाचे आमीष दाखवून अल्‍पवयीन मुलीवर धर्मांधाकडून कॅफेमध्‍ये बलात्‍कार !

लग्‍नाचे आमीष दाखवून एका अल्‍पवयीन मुलीवर वाई शहरातील एका कॅफेमध्‍ये बलात्‍कार करण्‍यात आला. या प्रकरणी वाई तालुक्‍यातील कडेगाव येथील समीर सलीम पटेल या युवकाला वाई पोलिसांनी अटक केली आहे.

अमरावती येथे राजमाता जिजाऊंना त्‍यांच्‍या जयंतीनिमित्त अभिवादन !

येथे पौष पौर्णिमा या दिवशी म्‍हणजेच ६ जानेवारीला राजमाता जिजाऊंच्‍या तिथीनुसार झालेल्‍या जयंतीनिमित्त स्‍वराज्‍याचा विधाता देणार्‍या वीरमातेला अभिवादन करण्‍यासाठी अमरावती शहर, तसेच गणेशपूर गावात रणरागिणी शाखेकडून स्‍मारक स्‍वच्‍छता आणि पूजन करण्‍यात आले.

हिंगोली जिल्‍ह्यात ३.६ रिश्‍टर स्‍केल भूकंपाची नोंद !

जिल्‍ह्यामध्‍ये गेल्‍या अनेक दिवसांपासून भूकंपाचे सत्र चालूच आहे. ८ जानेवारी या दिवशी पहाटे ४.३० वाजण्‍याच्‍या सुमारास जिल्‍ह्यातील वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी या तालुक्‍यांतील अनेक गावांना भूकंपाचा धक्‍का जाणवला.

अंबरनाथ येथे गांजा विक्रीसाठी आलेल्‍या तिघांना अटक !

अंबरनाथ परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्‍या रवि मुन्‍नीलाल जैस्‍वाल (वय ३५ वर्षे), हसून कय्‍युम खान (वय २५ वर्षे) आणि महंमद शॅडं रियाझ (वय २७ वर्षे) यांना ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाच्‍या गुन्‍हे शाखेने अटक केली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने एकलग्‍न (जळगाव) येथे ‘हिंदु राष्‍ट्र’ या विषयावर व्‍याख्‍यान !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने एकलग्‍न (जळगाव) येथे ‘हिंदु राष्‍ट्र’ या विषयावर ७ जानेवारीला रात्री व्‍याख्‍यान पार पडले. समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट आणि जळगाव जिल्‍हा समन्‍वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी उपस्‍थितांना संबोधित केले.

नागपूर खंडपिठाची फेसबुकला नोटीस !

बंदी असलेल्‍या नायलॉन मांजाची विक्री केल्‍याप्रकरणी ‘फेसबुक इंडिया ऑनलाईन सर्व्‍हिस प्रा. लि.’ला मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपिठाने ६ जानेवारी या दिवशी नोटीस बजावली आहे, तसेच ११ जानेवारीपर्यंत उत्तर देण्‍याचा आदेशही दिला आहे.

मेक्सिकोमध्ये चकमकीत १९ तस्कर आणि १० सैनिक ठार

अमली पदार्थ माफिया आणि सैनिक यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये १० सैनिक आणि १९ अमली पदार्थ तस्कर ठार झाले. अमली पदार्थ तस्करांनी जाळपोळ केली आणि रस्ते बंद केले.

महिला कर्मचार्‍यांना हिजाब घालण्यास ‘ब्रिटीश एअरवेज’ची अनुमती !

‘आधुनिक’ म्हणवून घेणार्‍या ब्रिटनमधील हवाई आस्थापन धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कसे मुसलमानधार्जिणे निर्णय घेत आहे, हेच यातून दिसून येते !