धर्माच्‍या नावाखाली अनधिकृत गोष्‍टी खपवून घेतल्‍या जाणार नाहीत ! – आमदार नीतेश राणे, भाजप

हिंदूंनी मोर्चा काढल्‍यावर कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होतो; मात्र ३ मजली अनधिकृत मदरसा उभा राहीपर्यंत कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण झाला नाही. या पुढे धर्माच्‍या नावाखाली अनधिकृत गोष्‍टी खपवून घेतल्‍या जाणार नाहीत, अशी चेतावणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी दिली.

अभिनेत्री राखी सावंत हिच्‍याकडून पतीसमवेतचा खोलीतील व्‍हिडिओ शेअर !

अभिनेत्री राखी सावंत हिने तिचा मुसलमान प्रियकर आदिल खान याच्‍या समवेत निकाह केल्‍याचे वृत्त नुकतेच उघड केले होते. आता तिने आदिलसमवेतचा स्‍वतःच्‍या खोलीतील व्‍हिडिओ शेअर केला आहे. यात आदिलने तिला मिठी मारलेली दिसत आहे.

नाशिक येथे नायलॉन मांजामुळे ११ पक्षी घायाळ, तर ४ पक्ष्यांचा मृत्‍यू !

मकरसंक्रांतीच्‍या दिवशी नायलॉन मांजा वापरण्‍यात आल्‍याने त्‍यात ११ पक्षी घायाळ झाले असून ४ पक्ष्यांचा मृत्‍यू झाला. यात ३ कबुतरे आणि १ घार यांचा समावेश आहे. नायलॉन मांजामुळे १५ पक्ष्यांचे पंख कापले गेले.

२४ जानेवारीला होणार्‍या ‘विराट हिंदु मोर्च्‍या’साठी तहसीलदारांना निवेदन !

येथे झालेल्‍या ‘लव्‍ह जिहाद’च्‍या घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर सकल हिंदु समाजाच्‍या वतीने २४ जानेवारीला ‘विराट हिंदु मोर्च्‍या’चे आयोजन करण्‍यात आले आहे. या मोर्च्‍याविषयी निवेदन देण्‍यासाठी २०० हिंदु बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते.

विटा (जिल्‍हा सांगली) येथे तरुणीला धमकी देऊन अतीप्रसंग : जाहिद लियाकत शिकलगार याला अटक

जाहिद लियाकत शिकलगार याने मैत्रीचा अपलाभ उठवून एका हिंदु तरुणीशी जवळीक साधली. यानंतर तिची छायाचित्रे काढून ती सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित करण्‍याची धमकी देऊन ४ मास अत्‍याचार केल्‍याची घटना १४ जानेवारीला समोर आली.

नांदेड येथील संत नामदेव मंदिर परिसराला पर्यटनस्‍थळाचा दर्जा देण्‍यासाठी प्रयत्न करणार ! – प्रतापराव पाटील-चिखलीकर, खासदार

मकरसंक्रांतीचे औचित्‍य साधून संत नामदेव महाराज मंदिर परिसरात शिंपी समाजाच्‍या वतीने खासदार चिखलीकर यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीमध्‍ये तीळगूळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. त्‍या वेळी ते बोलत होते.

‘लव्‍ह जिहाद’ हा देशासमोरील मोठा धोका !- रोहित पाटील, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान

‘लव्‍ह जिहाद’ हा देशासमोरील मोठा धोका आहे. त्‍यासाठी पाल्‍यांनी त्‍यांच्‍या मुलीला संस्‍कार देऊन त्‍यांचे या जाळ्‍यापासून रक्षण करावे, तसेच प्रत्‍येकाने धर्मशिक्षणही घेणे आवश्‍यक आहे. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन देशभक्‍ती आणि राष्‍ट्रभक्‍ती जोपासली पाहिजे, असे आवाहन ‘श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान’चे धारकरी श्री. रोहित पाटील यांनी केले.

पैलवान खाशाबा जाधव यांच्‍या जन्‍मदिनी गूगलकडून विशेष डूडलद्वारे श्रद्धांजली

भारताला वर्ष १९५२ मध्‍ये वैयक्‍तिक क्रीडा प्रकारात पैलवान खाशाबा जाधव यांनी पहिले ऑलिंपिक पदक मिळवून दिले. त्‍यांच्‍या जन्‍मदिनाचे औचित्‍य साधत गूगलने १५ जानेवारीला डूडलद्वारे विशेष श्रद्धांजली वाहिली. 

नेपाळमध्ये दक्षिण कोरियाच्या पाद्य्राकडून गरीब हिंदूंचे धर्मांतर !

२० वर्षात नेपाळमध्ये उभारले ७० चर्च !

सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांती मिशन अंतर्गत भारतीय महिला सैनिकांची तुकडी तैनात

यात २ सैन्याधिकारी आणि २५ सैनिक यांचा समावेश आहे.