पुणे येथील जिल्हा उद्योग केंद्रातील निरीक्षकास लाच घेतांना अटक !

‘पंतप्रधान रोजगार हमी योजने’अंतर्गत कर्ज संमत करण्यासाठी एका तरुणाकडून साडेतीन सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना जिल्हा उद्योग केंद्रातील निरीक्षक चंद्रभान गोहाड याला अटक करण्यात आली आहे.

मॉरिशस येथील इस्कॉन संप्रदायाचे प.पू. सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज यांना ‘सनातन पंचांग २०२३’ भेट !

इस्कॉन मंदिर, पिंपळगाव येथे मॉरिशस येथील प.पू. सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज यांचे ११ ते १३ जानेवारी या कालावधीत भक्तांसाठी सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय फोकमारे यांनी महाराजांना ‘सनातन पंचांग २०२३’ भेट दिले.

जिजाऊ निर्माण झाल्या, तरच शिवराय जन्माला येतील ! – सौ. पुष्पा चौगुले, हिंदु जनजागृती समिती

प्रत्येक स्त्रीने धर्माचरण केले पाहिजे. हिंदु धर्मशास्त्रातील प्रत्येक धार्मिक कृती मागील अध्यात्मशास्त्र स्वतः जाणून घेऊन आपल्या मुलांना सांगितले पाहिजे, तरच मुले धर्माचरण करतील.

पंचशीलनगर, दडगे प्लॉट येथील प्रार्थनास्थळाचे चालू असलेले अवैध बांधकाम बंद करा !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात पंचशीलनगर, दगडे प्लॉट येथील परिसरात महापालिकेच्या रस्त्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रार्थनास्थळाचे काम गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. हे अवैध बांधकाम तात्काळ बंद करावे, या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

हलाल अर्थव्यवस्थेचे धोके समजून घेणे आणि त्यास विरोध करणे हे प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाचे कर्तव्य ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भविष्‍यात व्‍यापारी, उद्यमी, नागरिक, समाज आणि राष्ट्र यांच्यासाठी मोठा धोका उद्भवू शकतो. यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. हलाल अर्थव्यवस्थेचे धोके समजून घेणे आणि त्यास विरोध करणे, हे प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट प्रतिपादन श्री. रमेश शिंदे यांनी केले.

राजस्थानमध्ये पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. यांच्या ९ ठिकाणी एन्.आय.ए.कडून धाडी

या प्रकरणी एस्.डी.पी.आय.शी संबंधित मुबारक याचा मुलगा नौशाद याला अटक करण्यात आली.

प्रजासत्ताक दिनापूर्वी देहलीत आतंकवादी आक्रमणाचा कट उघड : दोन संशयितांना शस्त्रांसह अटक !

जनतेला प्रत्येक वर्षी आतंकवादाच्या सावटाखाली देशाचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करावा लागणे, हे गेल्या ७५ वर्षांतील सर्व सरकारांना लज्जास्पद !

पाकच्या दूतावासाच्या ट्विटर खात्यावरून उघूर मुसलमानांच्या समर्थनार्थ ट्वीट !

टीका झाल्यावर खाते ‘हॅक’ झाल्याचा पाकचा दावा !

गुजरातमधील समुद्रकिनार्‍यावरील ११० किमी भूमी खचली !

‘इस्रो’च्या वर्ष २०२१ च्या संशोधनामध्ये लक्षात आले की, गुजरातचा १ सहस्र ५२ किमी किनारा स्थिर आहे, तर ११० किमीचा किनारा खचल्याने नष्ट होत चालला आहे.