आज घाटकोपर येथे हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ याविरोधात सरकारने कठोर कायदे करावेत, या एकमुखी मागणीसाठी घाटकोपर येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने आज भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे.

‘जी-२०’ पायाभूत सुविधा कार्यगटाची पहिली बैठक पुणे येथे पार पडली !

‘जी-२०’ पायाभूत सुविधा कार्यगटाच्या पहिल्या बैठकीचा नुकताच पुणे येथे समारोप झाला. या बैठकीला १८ सदस्य देश, ८ अतिथी देश आणि ८ आंतरराष्ट्रीय संघटनांचे ६४ प्रतिनिधी उपस्थित होते. भारताच्या जी-२० अध्यक्षतेअंतर्गत पायाभूत सुविधा कार्यगटाने वर्ष २०२३ साठी पायाभूत सुविधा कार्यक्रमावर चर्चा केली.

सोलापूर येथे आयकर विभागाकडून व्यावसायिकांवर धाडी !

करचोरी करणार्‍या व्यापारी आणि व्यावसायिक यांच्या विरोधात कारवाई करत रोखीने आणि कच्च्या कागदांवर झालेल्या व्यवहारांची कागदपत्रे आयकर विभागाने जप्त केली आहेत. मागील २ मासांपूर्वी आयकर विभागाने शहरातील विविध रुग्णालयांवर केलेल्या धाडीमध्ये १०० कोटी रुपयांचा गैरप्रकार समोर आला होता.

प्रजासत्ताकदिनी राजधानीत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांचा चित्ररथ साकारला जाणार !

२६ जानेवारी या दिवशी नवी देहली येथील कर्तव्यपथावर होणार्‍या संचलनात महाराष्ट्रातून कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, माहूरची श्री रेणुकादेवी आणि वणी येथील श्री सप्तशृंगीदेवी या साडेतीन शक्तीपिठांच्या प्रतिकृतींचा चित्ररथ साकारला जाणार आहे.

नागपूर येथे खासदार क्रीडा महोत्सवात पंच आणि आयोजक यांना मारहाण !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ‘खासदार क्रीडा महोत्सव’ चालू आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मुन्ना यादव यांच्या दोन्ही मुलांनी क्रिकेट सामना चालू असतांना पंचांसमवेत वाद घालून त्यांना मारहाण केली.

केंद्र आणि राज्य शासनाविषयीच्या निश्चितीमुळे उद्योजकांची महाराष्ट्रात गुंतवणूक ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

दावोस (स्वित्झर्लंड) तेथे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ (जागतिक आर्थिक मंच) मध्ये ५५ देशांतील उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक केली. केंद्र आणि राज्य शासनाविषयीच्या निश्चितीमुळे उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे

सातारा जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा नोंद !

सार्वजनिक स्‍वच्‍छतागृहाला ‘बाळाजी पंत नातू’ यांचे नाव देण्‍याचे प्रकरण

संभाजीनगर येथील महिलेचा विनयभंग करणार्‍या साहाय्यक पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा !

शहर पोलीस दलातील साहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांनी एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर शहरात ढुमे यांच्याविरुद्ध संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माघी यात्रेनिमित्त अपर जिल्हाधिकार्‍यांनी घेतली नियोजन आढावा बैठक !

भाविकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्याचे आदेश

नैताळे (जिल्हा नाशिक) येथे लाच मागणार्‍या ग्रामसेवकांसह दोघांना अटक !

जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे येथील मतोबा यात्रोत्सव समारोपाच्या पूर्वसंध्येला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० जानेवारी या दिवशी ७ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना ग्रामसेवकासह दोघांना रंगेहात पकडून अटक केली आहे.