कडेगाव (जिल्‍हा सांगली) येथील तहसील कार्यालयातील आवक-जावक विभाग तळमजल्‍यावर घ्‍यावा !

कडेगाव तहसील येथे आवक-जावक विभाग हा पहिल्‍या मजल्‍यावर आहे. येथे कामासाठी आलेल्‍या नागरिकांना संबंधित अधिकारी तिकीट लावण्‍यास, तसेच अन्‍य अधिकार्‍यांची स्‍वाक्षरी घेऊन येण्‍यास सांगण्‍यात येते. यामुळे सामान्‍य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

नवीन शैक्षणिक धोरण राबवण्‍यासाठी राज्‍यशासनाकडून समितीचे गठन !

महाराष्‍ट्रात नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्‍यासाठी राज्‍यशासनाकडून ११ जणांची समिती स्‍थापन करण्‍यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्‍या प्रधान सचिवांच्‍या अध्‍यक्षतेखाली ही समिती काम करेल.

अल्‍पसंख्‍यांकबहुल विद्यार्थ्‍यांच्‍या पायाभूत सुविधांसाठी राज्‍य सरकारकडून २ कोटी ७७ लाख रुपये संमत !

राज्‍यातील धार्मिक अल्‍पसंख्‍यांकबहुल विद्यार्थी असलेल्‍या १३९ शाळा आणि महाविद्यालये यांतील पायाभूत सुविधांसाठी वर्ष २०२२-२३ च्‍या दृष्‍टीने राज्‍य सरकारने २ कोटी ७७ लाख ९५ सहस्र ९७४ रुपये इतका निधी संमत केला आहे.

पुणे जिल्‍ह्यामध्‍ये ४३ बोगस शाळा; त्‍यातील ३० कायमस्‍वरूपी बंद

शहरातील केंद्रीय माध्‍यमिक शिक्षण मंडळाच्‍या (सी.बी.एस्.ई.) शाळांना बनावट (खोट्या) ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्‍यात आले. शिक्षण आयुक्‍त सूरज मांढरे यांनी राज्‍यातील शाळांच्‍या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्‍याचे आदेश दिले होते.

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्‍या खात्‍यात जमा झालेल्‍या४९ कोटी ८५ लाख रुपयांचा हिशोब त्‍यांना द्यावाच लागणार ! – किरीट सोमय्‍या

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्‍या खात्‍यात कोलकाता येथील दोन आस्‍थापनांमधील जमा झालेल्‍या ४९ कोटी ८५ लाख रुपयांचा हिशोब त्‍यांना द्यावाच लागणार आहे. याच समवेत त्‍यांच्‍या जावयाशी संबंधित असलेल्‍या आस्‍थापनाला प्रत्‍येक ग्रामपंचायतींना ५० सहस्र रुपये द्यावे लागतील…

वरुण गांधी यांची गळाभेट घेऊ शकतो; मात्र विचारसरणीला विरोध ! – राहुल गांधी

भाजपचे नेते वरुण गांधी यांची मी गळाभेट घेऊ शकतो; पण मी त्‍यांच्‍या विचारसरणीच्‍या विरोधात आहे. मी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाच्‍या कार्यालयात जाऊ शकत नाही. कार्यालयात जाण्‍यासाठी माझी मान कापावी लागेल.

दावोस (स्‍वित्‍झर्लंड) येथील ‘सामंजस्‍य करारां’मुळे महाराष्‍ट्रात विविध क्षेत्रांत गुंतवणूक !

जागतिक आर्थिक परिषदेच्‍या निमित्ताने येथे महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत उद्योगांसमवेत विविध ‘सामंजस्‍य करार’ करण्‍यात आले. मुख्‍यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या हस्‍ते ‘महाराष्‍ट्र पॅव्‍हेलियन’चे उद़्‍घाटन करण्‍यात आले.

आळंदी (जिल्‍हा पुणे) येथे ख्रिस्‍ती धर्म स्‍वीकारण्‍यासाठी पैशांचे आमीष दाखवण्‍याचा प्रकार

मरकळ गावात काही जण लोकांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्‍याचा प्रयत्न करत आहेत. ते लोकांच्‍या घरासमोर जाऊन ‘तुम्‍ही बायबल वाचता का ? चर्चमध्‍ये या, आम्‍ही तुमच्‍या व्‍यवसायाला आर्थिक साहाय्‍य करू’, असे आमीष दाखवत आहेत.

कोकण शिक्षक मतदारसंघाच्‍या निवडणुकीत ८ उमेदवार रिंगणात !

कोकण शिक्षक मतदारसंघाच्‍या द्विवार्षिक निवडणुकीत अन्‍य उमेदवारांनी त्‍यांचे अर्ज मागे घेतल्‍याने केवळ ८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

अभिनेत्री राखी सावंत हिच्‍याकडून विवाहानंतर इस्‍लाम धर्म स्‍वीकारल्‍याचे मान्‍य !

मुसलमान प्रियकर आदिल खान दुर्रानी याच्‍या समवेत मी निकाह केला आहे. आमच्‍यात धर्म नाही. आदिलने माझे नाव ‘फातिमा’ ठेवले आहे, असे अभिनेत्री राखी सावंत हिने सांगून इस्‍लाम धर्म स्‍वीकारल्‍याचे मान्‍य केले आहे.