काश्मीरमधील एजाज अहमद अहंगर याला भारत सरकारने घोषित केले आतंकवादी !

एजाज भारतात पुन्हा चालू करत आहे इस्लामिक स्टेट !

नवी देहली – केंद्रीय गृह मंत्रालयाने मूळचा काश्मीरमधील असलेला एजाज अहमद अहंगर उपाख्य अबू उस्मान अल-काश्मिरी याला आतंकवादी घोषित केले आहे. काश्मिरी याचे अल् कायदाशी संबंध आहेत. तो भारतात इस्लामिक स्टेटला पुन्हा चालना देण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या तो अफगाणिस्तानमध्ये रहात आहे. तेथे तो ‘इस्लामिक स्टेट जम्मू-कश्मीर’साठी आतंकवाद्यांना भरती करून घेत आहे. तो गेल्या २ दशकांपासून पसार आहे. अनेक आतंकवादी आक्रमणांत त्याचा सहभाग आहे.