(म्हणे) ‘सत्तेवर आल्यास २ वर्षांत म्हादईवर धरण उभारणार !’ – काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

म्हादईवरील प्रकल्पाला दिलेली मान्यता ही केवळ आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी केलेली फसवणूक आहे. भाजपला कळसा-भंडुरा प्रकल्प करायचे नाहीत. गोव्यातील काँग्रेसवाले आता सिद्धरामय्या यांचा निषेध करणार का ?

पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराज यांनी  शाम मानव यांचे आव्‍हान स्‍वीकारले !

बागेश्‍वर धामचे कथावाचक पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्‍थापक शाम मानव यांनी दिलेले आव्‍हान स्‍वीकारले आहे; मात्र समितीचे ३० लाख रुपयांचे पारितोषिक त्‍यांनी नाकारले आहे. मानव यांच्‍या सर्व प्रश्‍नांची विनामूल्‍य उत्तरे देण्‍यात येतील.

गोवा विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांचा एकमुखी ठराव !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा ठराव रूपांतर करून तो सरकारच्या वतीने मांडण्यात आल्याचे सभागृहात घोषित केले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी गटांतील बहुतांश आमदारांनी चर्चेत सहभाग घेऊन म्हादईच्या रक्षणासाठी संघटितपणे प्रयत्न करण्यावर भर दिला.

स्‍वत: लक्ष घालून आश्‍वासनांच्‍या पूर्ततेचा विषय मार्गी लावीन ! – अधिवक्‍ता राहुल नार्वेकर, अध्‍यक्ष, विधानसभा

विधीमंडळाच्‍या कामकाजाच्‍या दृष्‍टीने आश्‍वासन समिती महत्त्वाची आहे. यांतील प्रलंबित विषय सोडवण्‍यासाठी विलंब झाला असेल, तर अध्‍यक्ष म्‍हणून मी स्‍वत: लक्ष घालून हा विषय मार्गी लावीन, असे आश्‍वासन विधानसभेचे अध्‍यक्ष अधिवक्‍ता राहुल नार्वेकर यांनी दिले.

पंजाबमधील सैन्‍य मैदानात सापडले जिवंत बाँब !

पंजाबमध्‍ये यापूर्वी झालेल्‍या हिंसाचारांच्‍या घटनांमागे खलिस्‍तान्‍यांचा हात असल्‍याचे उघड झाले आहे. सरकार याही घटनांचे त्‍या दृष्‍टीने अन्‍वेषण करणार का ?

श्री. राहुल कौल

काश्‍मीर आतंकवाद मुक्‍त करण्‍यासाठी ‘ऑपरेशन ऑल क्‍लिन’ पूर्ण करा ! – राहुल कौल, राष्‍ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून कश्‍मीर

‘काश्‍मीरमधील आतंकवाद कधीपर्यंत ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

आम्‍हाला पाकशी सामान्‍य शेजार्‍यासारखे संबंध हवे आहेत; मात्र आतंकवाद नको ! – भारत

पाकिस्‍तान आणि आतंकवाद या एकाच नाण्‍याच्‍या दोन बाजू असल्‍याने ते एकमेकांपासून कधीही वेगळे होऊ शकत नाहीत, हे गेल्‍या ७५ वर्षांत संपूर्ण जगाने पाहिले आहे. त्‍यामुळे भारताने पाकशी चांगले संबंध ठेवण्‍यासाठी नव्‍हे, तर त्‍याला मूळासह नष्‍ट करण्‍यासाठी प्रयत्न केले पाहिजे !

रामसेतूला ‘राष्ट्रीय वारसा’ घोषित करण्याची प्रक्रिया चालू आहे ! – केंद्र सरकार

रामसेतूला ‘राष्ट्रीय वारसा’ घोषित करण्याची प्रक्रिया चालू आहे, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले. भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला ‘सरकारला रामसेतूच्या संदर्भातील अतिरिक्त पुरावे द्यावे’, असे निर्देश दिले.

गुजरातमध्ये जैन धर्मीय हिरे व्यापार्‍याच्या ८ वर्षांच्या मुलीने घेतली संन्यास दीक्षा !

जैन मुले लहान वयात संन्यास दीक्षा घेतात, याचे प्रमुख कारण म्हणजे पालकांकडून त्यांच्यावर होणारे धार्मिक संस्कार होय ! हिंदु पालक मात्र त्यांच्या मुलांना साधना शिकवत नाहीत. यामुळे मुले खर्‍या आनंदापासून वंचित रहातात !

बलुचिस्तानमध्ये इराणच्या सीमेवरून झालेल्या आक्रमणात पाकचे ४ सैनिक ठार

हे आक्रमण बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या बलुची लोकांच्या संघटनेकडून करण्यात आल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.