बार्शी येथे प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोघांना ३० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पकडले !

पांगरी पोलीस ठाण्यातील प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई आणि चहा कॅन्टीन चालक या तिघांना ३० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

संकटग्रस्त महिलांच्या साहाय्यासाठीचा ‘१८१’ हेल्पलाईन क्रमांक स्वतंत्रपणे कार्यरत होणार !

संकटग्रस्त, पीडित महिलांना तातडीने साहाय्य देण्यासाठी कार्यरत असलेला ‘१८१’ ‘टोल फ्री’ क्रमांक आतापर्यंत मुख्यमंत्री हेल्पलाईन क्रमांकामध्ये विलीन होता.

सुट्टीच्या काळात सहकार्‍याला संपर्क साधल्यास १ लाख रुपये दंड !

येथील ‘ड्रीम ११ फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म’ या आस्थापनाने सुट्टीच्या काळात सहकार्‍याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार्‍या कर्मचार्‍यांना १ लाख रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी (पुणे) येथील २ अनुदानित शाळांमध्ये अवघे ३-४ विद्यार्थी !

शहरातील ‘ज्ञानज्योती प्राथमिक विद्यालय, किवळे’ आणि ‘कमला नेहरू प्राथमिक विद्यालय, चिंचवड स्टेशन’ या खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये अवघी ३-४ विद्यार्थी संख्या आहे; मात्र प्रतिवर्षी बोगस पटसंख्या दाखवून शासनाकडून मिळालेले अनुदान घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

महाबळेश्वर येथे ९ सहस्रांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत हिंदु जनआक्रोश मोर्चा !

महाबळेश्वर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने नुकताच ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्च्याला प्रारंभ झाला. मुख्य बाजारपेठेतून मोर्चा मारुति मंदिरमार्गे नगरपालिकेजवळच्या मोकळ्या जागेत पोचला. तिथे मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले.

‘लव्‍ह जिहाद’च्‍या विरुद्ध लढण्‍यासाठी मी कुठेही यायला सिद्ध ! – सुरेश चव्‍हाणके, संपादक, ‘सुदर्शन न्‍यूज’

‘लव्‍ह जिहाद’च्‍या विरुद्ध लढण्‍यासाठी आवश्‍यकता असेल, तेथे उपस्‍थित रहायला मी सिद्ध आहे. ‘लव्‍ह जिहाद’मध्‍ये जर कोणत्‍याही मुलीची हत्‍या होत असेल, तर त्‍या प्रकरणाचा निपटारा ३० दिवसांच्‍या आत करण्‍यात यावा.

काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत ! – डॉ. डी.एम्. मुळ्ये, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग

काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करण्यासह त्यांच्यावर अत्याचार करणार्‍यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !

वाय.सी.एम्. रुग्णालयातील ‘ओ.सी.टी.’ यंत्र खरेदीची चौकशी करावी ! – आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस  

महापालिकेच्या ‘यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालया’त रुग्णांचे डोळे पडताळण्यासाठी भांडार विभागाने ‘ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी’ (ओ.सी.टी.) यंत्राची खरेदी करतांना घोटाळा झाला. या घोटाळ्याची चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आणि त्याची चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत.

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याविरोधातील याचिका फेटाळली !

गतवर्षी वनविभागाने विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ केला. त्या विरोधात २५ अतिक्रमणकर्त्यांनी याचिका प्रविष्ट केली होती. अतिक्रमणे काढण्यास न्यायालयाने मनाई केली. १० जानेवारीच्या सुनावणीत जिल्हा सरकारी अधिवक्ता विवेक शुक्ल यांनी युक्तिवाद केला.

नागपूर जिल्हा परिषदेतील निवृत्तीवेतन घोटाळ्याच्या व्याप्तीत वाढ

येथील जिल्हा परिषदेतील निवृत्तीवेतन घोटाळ्याची व्याप्ती वाढत आहे. प्रारंभी घोटाळा १ कोटी ८६ लाख रुपयांचा असल्याचा अंदाज वर्तवला होता; मात्र हा घोटाळा आता २ कोटी ७५ लाख रुपयांपर्यंत गेला आहे. याविषयीचा अहवाल पारशिवनी पंचायत समितीने पोलिसांना सादर केल्याचे समजते.