भाजपचे आमदार कृष्णा साळकर आणि त्यांचे समर्थक यांची चेतावणी
वास्को, ४ जानेवारी (वार्ता.) – वास्को येथील बायणा समुद्रकिनार्यावरील श्री मारुति मंदिराच्या पुजार्याला अमानुष मारहाण करणार्यांवर पुढील ४ दिवसांत कठोर कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण गोमंतकीय नागरिक वास्को पोलीस ठाण्यावर मोर्चा आणतील, अशी चेतावणी भाजपचे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर आणि त्यांचे समर्थक यांनी वास्को पोलिसांना दिली आहे.
आमदार कृष्णा साळकर आणि त्यांचे मोठ्या संख्येने जमलेले समर्थक यांनी ४ जानेवारी या दिवशी वास्को येथील पोलीस उपअधीक्षक शेख सलीम यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली. आमदार साळकर आणि त्यांचे समर्थक यांनी बायणा येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.
Tense situation at Goa's Baina after Hindu priest assualt https://t.co/egMAy7Si6w
— Goemkarponn (@goemkarponnlive) January 4, 2023
पोलीस उपअधीक्षकांना भेटल्यानंतर पत्रकारांना आमदार कृष्णा साळकर म्हणाले, ‘‘बायणा येथील घटना ही एका धर्मगुरूवरील आक्रमण आहे. या घटनेतील सर्व संशयितांना कह्यात घेऊन त्यांच्या विरोधात दंगल करणे, अनधिकृतपणे जमाव जमवून आक्रमण करणे आदी गुन्हे नोंदवले पाहिजेत. हे प्रकरण आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत पोचवले आहे.’’
पोलिसांची वागणूक संतापजनक
या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या तक्रारदारांना संबंधित पोलिसांनी संतापजनक वागणूक दिली. या वेळी पोलीस आसंदीवर पाय ठेवून तक्रारदारांशी बोलत होते. या वेळी एक पोलीस पुजार्याच्या मुलाकडे अरेरावीने बोलला. या पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे.’’