प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी घालण्याविषयी प्रशासन उदासीन का ? – कुंभार समाज संघटना

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने २५ ऑगस्ट २०२१ या दिवशी दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, ‘पीओपी’पासून बनवलेली काेणतीही मूर्ती पूजेसाठी विकता येणार नाही. अशा मूर्ती सार्वजनिक किंवा घरगुती तलावात विसर्जित करता येणार नाहीत.

मालाड (मुंबई) येथील ‘टिपू सुलतान’ उद्यानाचे नाव पालटण्याचा जिल्हाधिकार्‍यांना आदेश !

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री असतांना मालाड येथील उद्यानाला ‘टिपू सुलतान’ याच्या नावाची कमान लावण्यात आली होती.

नवीन संसद भवनात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावावे !

छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी !

उच्च शिक्षणही मातृभाषेतून मिळणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण हे मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ‘बालभारती’ हा पुस्तक निर्मिती करणारा विभाग असला, तरी पुढील काळासाठी चित्रफीतीद्वारे लहान मुलांना शिक्षणाची सोय करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचे उद्घाटन महाराष्ट्रातील साधू, संत आणि महंत यांच्या हस्ते करणार ! – नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री

फलटण (जिल्हा सातारा) येथे विविध रस्तेकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, तसेच जिल्ह्यातील आमदार अन् विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

आमदार संतोष बांगर यांच्यासह ३० जणांवर गुन्हे नोंद !

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्यांना मारहाण केल्याचे प्रकरण

जिवे मारण्याची धमकी देणार्‍या पुणे येथील तरुणाला अटक !

(म्हणे) ‘धमकी देणार्‍यांमध्ये ‘सनातन प्रभात’सारखे लोक असू शकतात !’ शाम मानव यांनी तोडले अकलेचे तारे !

मी अन्वेषण यंत्रणांचा बळी ठरलो ! : हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांची न्यायालयीन निर्णयावर प्रतिक्रिया

धनंजय देसाई यांनी सांगितले की, मोहसीन शेख याची हत्या हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा ठपका ठेवला होता. न्यायालयाने माझ्यासह कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केल्याने समाधान वाटते. शेख याची हत्या जमावाने केली.

नागरिकांच्या उपोषणानंतर लक्ष्मीवाडी, कुडाळ येथील गॅस केंद्र अवैध असल्याचे घोषित

नागरिकांना केंद्र अवैध असल्याचे कळते, ते न कळणारे नगरपंचायत प्रशासन काय कामाचे ? अवैध बांधकाम उभे राहीपर्यंत प्रशासन काय करत होते ?

म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवून तेथील शेतकर्‍यांचा पाण्याचा तुटवडा दूर केला ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढे भाषणात वर्ष २००७ मध्ये काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी ‘म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवू देणार नाही’, असे विधान केल्याचे उपस्थितांना स्मरण करून दिले.