‘श्रीगीता पठण आभासी (ऑनलाईन) अंतिम स्‍पर्धे’त नागपूर येथे सनातनचा बालसाधक कु. आदिनाथ देशपांडे (वय ८ वर्षे) याला प्रथम पारितोषिक !

श्रीचिन्‍मय मिशनच्‍या वतीने ‘श्रीगीता पठण आभासी अंतिम स्‍पर्धा ’ डिसेंबर २०२२ मध्‍ये आयोजित करण्‍यात आली होती. त्‍या स्‍पर्धेत सनातनचा बालसाधक कु. आदिनाथ अंकुश देशपांडे (वय ८ वर्षे) याला प्रथम पारितोषिक म्‍हणून एक ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि स्‍वामी विवेकानंदांविषयीचे पुस्‍तक मिळाले.

मंत्र्यांनी पत्रावर दिलेल्‍या शेर्‍यावरील कार्यवाहीविषयी अधिकार्‍यांना कळवावे लागणार !

सर्वसामान्‍य नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी निवेदन, पत्र दिल्‍यावर मुख्‍यमंत्री, उपमुख्‍यमंत्री, तसेच अन्‍य मंत्री त्‍यावर शेरा देतात. याविषयी गुणवत्तापूर्वक कार्यवाही करून संबंधितांना कळवण्‍यात यावे, असा आदेश महाराष्‍ट्र शासनाने दिला आहे.

हिंदु युवतींनी रणरागिणी होऊन ‘लव्‍ह जिहाद’चा सामना करण्‍यासाठी सिद्ध व्‍हावे ! – सौ. गौरी जोशी, रणरागिणी शाखा

ज्‍या देशात पुरुषांच्‍या बरोबरीने नव्‍हे, तर प्रसंगी युद्धात नेतृत्‍व घेऊन धर्मांध आक्रमकांना परतवून लावणार्‍या राजमाता जिजाऊ, राणी चेन्‍नम्‍मा यांसारख्‍या शूर, कर्तबगार स्‍त्रिया झाल्‍या, त्‍या देशातील हिंदु तरुणी धर्मांधांच्‍या खोट्या प्रेमाला फसून ‘लव्‍ह जिहाद’ला बळी पडत आहेत.

नागपूर येथे दाट धुक्‍यामुळे ३३ रेल्‍वेगाड्यांना विलंब !

शहरात मोठ्या प्रमाणात दाट धुके पसरल्‍याने त्‍याचा रेल्‍वेसेवेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्‍यामुळे नागपूर येथून धावणार्‍या अनेक रेल्‍वेगाड्या विलंबाने धावत असल्‍याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

राज्‍यातील ६६६ ‘सी.बी.एस्.ई.’ शाळांच्‍या प्रमाणपत्रांची पडताळणी !

शिक्षण आयुक्‍त सूरज मांढरे म्‍हणाले की, बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांकडे तक्रार प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे. राज्‍यातील ६६६ शाळांची माहिती जुळत नसल्‍याने संबंधित शाळांच्‍या मान्‍यतेच्‍या संदर्भातील कागदपत्रे पडताळण्‍याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांना देण्‍यात आले आहेत.

भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे आणि ‘ईगल ब्रिगेड फाऊंडेशन’ या संस्‍थेचे संस्‍थापक विश्‍वनाथ बिवलकर यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला भेट !

येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमाला मुलुंड (पू.) येथील भाजपचे माजी नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांनी, तसेच कला, क्रीडा आणि मुलाखत यांसाठी मुलांना मार्गदर्शन करणार्‍या ‘ईगल ब्रिगेड फाऊंडेशन’ या संस्‍थेचे संस्‍थापक अन् कोलशेत (ठाणे) येथील श्री. विश्‍वनाथ बिवलकर यांनी ९ जानेवारी या दिवशी भेट दिली.

संस्‍कृत भाषा ही भारतीय संस्‍कृतीचा पाया आहे ! – जयश्री साठे, ज्‍येष्‍ठ संस्‍कृत प्राध्‍यापिका

संस्‍कृत भाषा अतिशय समृद्ध आहे. या भाषेमध्‍ये अपार ग्रंथसंपदा आहे. संगीत, नाट्य या कला संस्‍कृत साहित्‍याने समृद्ध आहेत. संस्‍कृत भाषा ही भारतीय संस्‍कृतीचा पाया आहे.

जगभरात मराठी भाषा पोचवण्‍यासाठी ‘पोर्टल’ उभे करणार ! – सुधीर मुनगंटीवार

‘मराठी पाऊल पडते पुढे’ या पद्धतीने आपल्‍याला काम करायचे आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. ‘मराठी माणसाने जगात पुढे जाण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच त्‍याला पाठिंबा देण्‍याची व्‍यवस्‍था केली पाहिजे’, असे विचार चंद्रकांत पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

कर्नाटकात शाळेत मुलांना धार्मिक शिक्षण आणि सात्त्विक आहार देणार !

त्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील नैतिक शिक्षणाच्या वर्गांमध्ये धार्मिक ग्रंथांची माहिती देण्याविषयी चर्चा चालू आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून ते चालू करण्याविषयी प्रयत्न करणार आहेत, असे शालेय शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी सांगितले.