आजपासून इयत्ता दहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग २६ जानेवारीपर्यंत ‘ऑनलाईन’ ! – डॉ. शेखर साळकर, जलद कृती समिती

दहावी, अकरावी आणि बारावी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात येत असल्याने त्यांना आपापल्या शाळेत उपस्थित रहावे लागणार आहे; मात्र लस घेतल्यानंतर ते घरी थांबू शकतात आणि घरूनच ‘ऑनलाईन’ वर्गांना उपस्थित राहू शकतात.

(म्हणे) ‘सूर्यनमस्काराचा कार्यक्रम भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध !’

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली रस्त्यावर नमाजपठण करून अन्य धर्मियांना त्रास देता, हिंदूंच्या मंदिरांमध्ये नमाजपठण करता. याच न्यायाने धर्मनिरपेक्षतेच्याच नावाखाली सूर्यनमस्कार सरकार आयोजित करत असेल, तर ते योग्यच होय !

राहुल गांधी ‘अपघाती’ हिंदू असून त्यांना मंदिरात कसे बसतात, हेही ठाऊक नाही ! – योगी आदित्यनाथ यांची टीका

निवडणूक आल्यानंतर राहुल गांधी यांच्यासारखे लोक ‘हिंदू’ बनून बाहेर पडतात. यांचे पूर्वजच सांगायचे ‘आम्ही ‘अ‍ॅक्सिडेंटल’ हिंदू आहोत.’ अशा शब्दांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

‘म. गांधी यांनी देशाचे तुकडे केल्याने ते ‘महात्मा’ नाहीत आणि ‘राष्ट्रपिता’ही होऊ शकत नाहीत’, असे म्हणणारे तरुण मुरारी बापू यांच्यावर गुन्हा नोंद !

तरुण मुरारी बापू अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. तरुण मुरारी बापू यांनी छिंदवाडा रोडवरील वीरा लॉन येथे श्रीमद् भागवत कथेच्या वेळी वरील विधान केले होते.

राज्यात कुणालाही वैयक्तिक सुरक्षा पुरवावी लागू नये, अशी स्थिती निर्माण करणार !

अशा प्रकारचा विश्‍वास सध्याच्या काळात बाळगणार्‍या सरमा यांना शुभेच्छा; मात्र केवळ आसाममध्येच नव्हे, तर संपूर्ण देशात गेल्या ७४ वर्षांत अशी स्थिती निर्माण होऊ शकली नाही, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे, हेही तितकेच सत्य आहे !

महापालिका क्षेत्रातील सांडपाण्यामुळे मिरज हद्दीतील ४०० एकर भूमी खराब; पाणी सोडणार्‍यांवर कारवाई करा ! – जयगोंड कोरे, भाजप

हिंदूंच्या प्रत्येक उत्सवांत प्रदूषणाचे कारण सांगून आरोळी ठोकणारे पर्यावरणप्रेमी, तसेच गणेश विसर्जनावर टीका करणारे अशा प्रसंगी कोणत्या बिळात जाऊन लपतात ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांनी आमचा वापर केला ! – चंद्रदीप नरके, शिवसेना

महाविकास आघाडी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचना आम्ही पाळल्या. असे असतांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला का साहाय्य करत नाही ?’’

बुद्धीप्रामाण्यवाद्यांची पात्रता !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील ‘देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने ‘वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले